मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. शनिवारी (दि.२१) कमी दाब क्षेत्राचे ‘तेज’ चक्रीवादळात रूपांतर झाले. आज (दि.२२) दुपारी हे चक्रीवादळ तीव्र बनले आहे. उद्या सोमवारी ‘तेज’ या चक्रीवादळाची आणखी तीव्रता वाढण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे. (Cyclone Tej)
- Advertisement -
चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काही परिणाम होणार नाही. परंतु दक्षिणेकडील हवामानावर त्याचा परिणाम होणार आहे. यामुळे तामिळनाडूत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ २५ ऑक्टोबर रोजी येमेन आणि ओमान दरम्यान जाणार आहे. त्यानंतर हे वादळ शांत होईल, असे आयएमडीने म्हटले आहे.