Saturday, May 4, 2024
Homeनगरदाढ खुर्दला तरुणावर बिबट्याचा हल्ला

दाढ खुर्दला तरुणावर बिबट्याचा हल्ला

आश्वी/ दाढ खुर्द |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द शिवारातील हनुमानवाडी परिसरात राहत असलेल्या ज्ञानेश्वर निवृत्ती अंत्रे (वय 35) या तरुणावर बुधवारी पहाटे बिबट्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात हा तरुण जखमी झाला आहे.

- Advertisement -

याबाबत स्थानिकांकडून मिळालेली माहिती अशी की, ज्ञानेश्वर अंत्रे हा तरुण पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास शेतात उभारलेल्या गोठ्यात स्वच्छता करत होता. यावेळी शेणाची टोकर टाकण्यासाठी गोठ्यापासून थोड्या अतंरावर चालला असताना शिकारीच्या शोधात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. याप्रसंगी ज्ञानेश्वर याने प्रसंगसावधान दाखवत मोठ्याने आरडा-ओरडा केल्यामुळे बिबट्याने तेथून पलायन केले. मात्र यापूर्वी बिबट्या व ज्ञानेश्वर यांच्यात दोन ते तीन मिनिटे जोरदार झुंज झाल्यामुळे ज्ञानेश्वर यांच्या हातावर व डोक्याला जखमा झाल्यामुळे रक्तस्राव होत होता.

त्यामुळे कुटुंबासह स्थानिकाच्या मदतीने त्याला प्राथमिक उपचारासाठी लोणी व पुढील उपचारासाठी नगर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच दाढ खुर्दचे सरपंच सतिष जोशी हे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी जखमी तरुणासह कुटुंबाचे धाडस वाढवत योग्य ती मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिलेे.

ड्रोनच्या सहाय्याने बिबट्याचा व इतर वन्य प्राण्यांचा शोध घेऊन तात्काळ येथील वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सरपंच सतिष जोशी, नितीन पाबळे, दिपक अंत्रे, ग्रामपंचायत सदस्य शरद बनगैया, स्वंप्नील अंत्रे, गोविंद पाबळे, संतोष दातीर, पप्पु अंत्रे, शरद गिते, रोहिदास गिते, गिताराम अंत्रे, ज्ञानेश्वर साळवे, रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे सरचिटणीस किशोर वाघमारे काँग्रेसचे आश्वी चे गटनेते किशोर जोशी, सुनील जोशी, गणेशराव जोरी गणेश जोशी, शंकर जोशी, लहुजी सेनेचे दगडू साळवे डॉ. राजेंद्र साळवे. माजी सरपंच संजय जोशी, अशोकराव जोशी, गोकुळ कहार, कैलास कहार, हरिदास कहार आदींनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या