धुळे । Dhule । प्रतिनिधी
- Advertisement -
शिरपूर तालुक्यातील डाबक्यापाडा गाव शिवारातील गांजा शेतीवर छापा टाकत पोलिसांनी कारवाई केली. एकुण 50 हजारांची गांजाची झाडे जप्त करण्यात आली. याप्रकरणी एकावर शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे काल साडेबारा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. डाबक्यापाडा येथील भाईदास कांज्या पावरा हा गावातील वनजमिनीवर गांजांची बेकायदेशीरपणे शेती करीत होता. पोलिसांनी दुपारी पावणेबारा वाजेच्या सुमारास तेथे छापा टाकला. शेतातील गांजाची झाडे मुळासकट उपटून एकुण 50 किलो वजनाची झाडे जप्त करण्यात आली. त्याची किंमत 50 हजार 465 रूपये इतकी आहे. याप्रकरणी पोहेकाँ ललीत पाटील यांच्या फिर्यादीवरून भाईदास पावराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.