Monday, November 25, 2024
Homeमनोरंजनयंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ‘या’ दिग्गज अभिनेत्रीला जाहीर

यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ‘या’ दिग्गज अभिनेत्रीला जाहीर

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख (Actress Asha Parekh) यांना यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Award) जाहीर करण्यात आला आहे.

३० सप्टेंबर रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हिंदी सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. आशा पारेख यांना यापूर्वी सरकार कडून ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

- Advertisement -

२ ऑक्टोबर १९४२ रोजी गुजरातमध्ये त्यांचा जन्म झाला होता. गुजराती कुटुंबातून येणाऱ्या आशा यांच्या आई मुस्लिम आणि वडील गुजराती होते. ६०-७० च्या दशकात आशा पारेख या केवळ चित्रपटांमुळेच नाही तर त्यांच्या मानधनामुळेही चर्चेत असायच्या.

तेव्हाच्या काळात आशा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. आशा यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.

वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली. ७९ वर्षीय आशा पारेख या ‘दिल देके देखो’, ‘कटी पतंग’, ‘तीसरी मंझील’ आणि ‘कारवां’ यासारख्या सिनेमांसाठी प्रसिद्ध आहेत.

हिंदी चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतच्या सर्वात प्रभावशाली अभिनेत्रींपैकी त्या एक आहेत. त्यांनी निर्माती दिग्दर्शक म्हणूनही ओळख मिळवली. पारेख यांनी १९९० साली आलेल्या प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘कोरा कागज’चे दिग्दर्शन केले होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या