Sunday, November 24, 2024
Homeधुळेविरोधकांच्या आरोपांना विकास कामातून उत्तर देवू - मुख्यमंत्री

विरोधकांच्या आरोपांना विकास कामातून उत्तर देवू – मुख्यमंत्री

धुळे । प्रतिनिधी dhule

आमचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. एका वर्षात सर्वसामान्यांच्या हिताचेच निर्णय घेतले. अजितदादा व सहकारी आल्याने आमची ताकद वाढली आहे. सरकारला वाढता पाठींबा आणि शासन आपल्या दारी अभियानाची वाढती लोकप्रियता, यामुळे विरोधकांना धडकी भरली आहे. त्यांना काय करावे ते सुचत नाही. त्यामुळे ते उलट-सुलट चर्चा, आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. मात्र आम्ही या आरोपाला विकास कामांच्या माध्यमातून उत्तर देवू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी धुळ्यात केले.

- Advertisement -

शासन आपल्या दारी अभियानातंर्गत जिल्ह्यास्तरीय कार्यक्रम आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज कार्यक्रमाला येवू शकले नाहीत. कारण त्यांच्याकडे गृहमंत्रालयाची जबाबदारी आहे. संपुर्ण राज्याच्या अधिकारी वर्गाची महत्वाची कॉन्फरन्स मुंबईमध्ये सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याचे उद्घाटन केले आणि ते इकडे आले. पंरतू गृहमंत्री या नात्याचे फडणवीस यांना तिथे थांबणार आहेत, म्हणून ते कार्यक्रमाला येवू शकले नाहीत, याचीपण नोंद घ्यावी, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी आपल्या भाषणादरम्यान सांगितले.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खान्देश कुलस्वामिनी आई एकविरा देवीला नमन करून अहिराणीने भाषणाला सुरूवात केली. कार्यक्रमाची दुपारी एक वाजेची वेळ दिली होती. आता पाच वाजले आहेत. तरी सुध्दा तुम्ही हजारोंच्या संख्येने उपस्थित राहीलात. हे चित्र फार कमी पहायला मिळते, असे म्हणत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. तसेच ज्यांना पोटात कळा येतात, त्यांना हे चित्र दाखवा, असा टोलाही विरोधकांना लगावला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या