Wednesday, January 7, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : १ मार्च २०२५ - धोक्याची घंटा

संपादकीय : १ मार्च २०२५ – धोक्याची घंटा

वातावरण बदलाचा फटका जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टला देखील बसत आहे. शिखरावर ज्या गतीने बर्फ तयार झाला त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक गतीने बर्फ वितळला आहे. गत दोन महिन्यात तब्बल पाचशे फूट बर्फ गायब झाल्याचे सांगितले जाते. हा वाढत्या उष्णतेचा परिणाम आहे. बर्फाचे आवरण कमी होण्याचा परिणाम शेती आणि पिण्याच्या पाणीपुरवठ्यावर होईल. हिमस्खलन आणि दुष्काळ अशा आपत्ती वाढतील.

चक्रीवादळे, पूर, दुष्काळ, अतीवृष्टी यांचे प्रमाण वाढेल. परिणामी शेती उद्ध्वस्त होईल. एव्हरेस्टवरील बर्फ वितळणे ही शेवटची घंटा ठरेल असा इशारा शास्त्रज्ञ देत आहेत. सुमारे काही अब्ज लोक पाण्यासाठी या पर्वतराजींवर अवलंबून आहेत. हे झाले एव्हरेस्टचे. पण बदलते ऋतुचक्र, हिमालयातील हिमनद्यांचे वितळणे याचा अनुभव सर्वांनाच येतो. सर्वात उष्ण गणल्या जाणार्‍या महिन्यांचे किंवा कमी काळात अती पाऊस पडण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याची जागतिक आणि सामूहिक पातळीवरील अनेक कारणे सांगितली जातात. याला मानवी वर्तन कसे जबाबदार आहे हे माणसांनी समजून घेण्याची गरज शास्त्रज्ञ व्यक्त करतात.

- Advertisement -

जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण लक्षणीय कमी करावे लागेल. त्याबरोबरीने त्याची निर्मितीच कमी कशी होईल याचेही प्रयत्न जागतिक पातळीवर केले जायला हवेत. त्याचे रूपांतरण अन्य घटकात करता येईल का याविषयी देखील संशोधन सुरु असल्याचे सांगितले जाते. अनेक देशांनी एकत्र येऊन सतत विकास लक्ष्य (सस्टेनेबल गोल्स) ठरवली आहेत. जागतिक पातळीवर सुरु असलेल्या अशा प्रयत्नांची मीमांसा माध्यमातून तज्ज्ञ करतात. सामान्य माणसेही तापमानवाढीची अनेक कारणे जाणून असावीत. पण ती कमी करण्यासाठी त्यांनी कसा हातभार लावायचा याविषयी मात्र संभ्रम आढळतो. ते करू शकतील अशा एका उपायावर मात्र तज्ज्ञांचे एकमत आढळते, ते म्हणजे झाडे लावणे.

YouTube video player

वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईड कमी करण्यात झाडे मोलाची भूमिका बजावतात. हवेची गुणवत्ता वाढवतात. तेव्हा झाडे लावण्याचे काम सामान्य माणसे सामूहिक पातळीवर करू शकतील. झाडे लावण्याची आणि ते रुजवण्याची मोहीम हाती घेतली जाऊ शकेल. देवराया निर्माण केल्या जाऊ शकतील. देवराईंमुळे जलस्रोत, औषधी वनस्पती, जैविविधता आणि वन्यजीवांची साखळी निर्माण होते आणि ती संरक्षित देखील होते असे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधवराव गाडगीळ म्हणतात. जागतिक-सामूहिक आणि वैयक्तिक पातळीवरील असे जोरदार प्रयत्नच तापमानवाढीत मानवतेचे हित साधू शकतील हेच खरे.

ताज्या बातम्या

AMC Election : पैसे वाटपाचा संशय, विनानंबर दुचाकीतून लाखाची रोकड पकडली

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याच्या संशयावरून एका पक्षाच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी दोन दुचाकी अडवून त्या तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिल्या....