Tuesday, July 23, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : ९ जुलै २०२४ - आवाजाचे भान राखणे गरजेचे

संपादकीय : ९ जुलै २०२४ – आवाजाचे भान राखणे गरजेचे

पावसाळी महिने सणांची पा नांदी घेऊन येतात. अनेक सार्वजनिक सण या काळात साजरे होतात. ते धुमधडाक्यातच साजरे व्हावेत. तथापि सणांच्या दिवशी कानठळ्या बसवणारे स्पीकर आणि लेझर लाईट्सना बंदी घालावी अशी मागणी पुणेकरांनी मुख्यमंत्र्यांकडे नुकतीच केली. तशा आशयाचे निवेदन ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पाठवले असल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. वाढत्या प्रदूषणाने समाज त्रस्त आहे. त्याअर्थान निवेदन पुणेकरांनी पाठवले असले तरी भावना मात्र सामाजिक आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

- Advertisement -

हे देखील वाचा : संपादकीय : ८ जुलै २०२४ – कर्तव्येही महत्वाची!

आवाजाचा दणदणाट कोणालाही त्रासदायकच ठरू शकतो. त्याचे दुष्परिणाम वेगळे सांगण्याची गरज नाही. ते लोक जाणून आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये डीजे वाजवण्याची पद्धत अलीकडच्या काळात रूढ झाली आहे. त्या आवाजाचा त्रास सर्वानाच होतो. आवाजाची तीव्रता डेसिबलमध्ये मोजली जाते. माणसाचे कान साधारणपणे ७० डेसिबलपर्यंतचा आवाज ऐकू शकतात. डीजेच्या आवाजाची तीव्रता त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त असते. केवळ डीजेच नव्हे तर विशिष्ट डेसिबलपेक्षा कोणताही जास्त आवाज मानवी कान जायबंदी करू शकेल.

हे देखील वाचा : संपादकीय : ६ जुलै २०२४ – प्रेरणादायी भाषण

कान किटवणाऱ्या आवाजात जास्त काळ राहणे अनेकार्थांनी धोकादायक ठरू शकते. सतत कानावर पडणाऱ्या मोठ्या आवाजामुळे कानाच्या आतील पेशी जायबंदी होतात. त्याचा ऐकण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. लोक जितका जास्त काळ हा आवाज ऐकतील तितका धोकाही वाढू शकतो. काहींना तात्पुरते तर काहींना कायमचे बहिरेपण येऊ शकते. चक्कर येऊ शकते. माणसे चिडचिडी होऊ शकतात. हृदयाचे ठोके सुद्धा अनियमित होण्याचा धोका वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

हे देखील वाचा : संपादकीय : ५ जुलै २०२४ – धोक्याची घंटा

लेझर लाईटचे देखील अनेक धोके असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अनेकांना अंधत्व येण्याचा धोका व्यक्त केला जातो. इतके सगळे दुष्परिणाम माणसांना सहन करावे लागतात. ध्वनी प्रदूषण वाढते ते वेगळेच. तरीही अशा गोष्टींचा आग्रह का धरला जात असावा? माणसाच्या ऐकण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त आवाज ऐकणे हिताचे नाही याचे भान सर्वानी राखण्याची गरज आहे असे नेहमीच बोलले जाते. पण तसे घडताना मात्र का आढळत नसावे? केवळ यातच नव्हे तर एकूणच सामाजिक भान वाढण्याची गरज आहे.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या