समाजमाध्यमांवरील प्रसिद्धीचा हव्यास आता मृत्यूच्या (Death) दाढेपर्यंत पोहोचायला लागला आहे. रिल्सशी संबंधित मन अस्वस्थ करणारे वृत्त प्रसिद्ध होत नाही असा दिवस क्वचितच उगवावा अशी सद्यस्थिती आहे. तीनशे फूट खोल पडून मृत्यू पावलेल्या अन्वी कामदारच्या घटनेची वेदना कमी होत नाही तोच मध्य प्रदेश मुरेना येथे ११ वर्षांच्या मुलाचा गळफास बसून मृत्यू झाला. खेळतांना तो आणि त्याचे मित्र रिल्स बनवण्याचा प्रयत्न करत होते असे प्रसिद्ध झालेल्या वृतांत म्हटले आहे.
हे देखील वाचा : संपादकीय : २३ जुलै २०२४ – वेळ अजूनही गेलेली नाही
कार चालवतानाचा रील बनवण्याच्या नादात छत्रपती संभाजीनगरमध्ये कार दरीत कोसळून तरुणीचा मृत्यू झाला. अशा घटना घडण्याचे प्रमाण वाढतच आहे. समाजमाध्यमांवरील प्रसिद्धीचे गारुड इतके खोलवर भिनले आहे की युवा विचारशक्ती गमावून बसत असावेत का? अन्बी सीए झालेली होती. बयाची एकबौशी ओलांडलेल्या युवाकडून समाजाला किमान समजूतदारपणाची अपेक्षा असणे चूक मानले जाऊ शकेल का? तथापि अलीकडच्या काही घटनांमधील युवांनी वयाची किमान विशी ओलांडलेली होती. फारसे कर्तृत्व न दाखवता समाजमाध्यमांवर प्रसिद्धी मिळते. प्रभावकांना (इन्फ्लुएन्सर्स) ना आर्थिक कमाई होते, त्याचाही मोह होण्याचे ते वय असते हे खरे. तथापि सगळ्याच प्रभावकांना पैसे मिळतात हा भ्रम झालेला आढळतो.
हे देखील वाचा : संपादकीय : २२ जुलै २०२४ – योजना स्वागतार्ह; पण..
समाजमाध्यमांवरील कमाईचे गणित समजावून घ्यावे असे शिकलेल्या युवांनाही बाटू नये. त्यांना लाखो मुले फॉलो करतात ती किती प्रभावक त्यांची जबाबदारी मानतात ? किंबहुना अतरंगी गोष्टी करणे, अतिरेकी धाडस करणे, जीव धोक्यात घालणे हा प्रसिद्धीचा हव्यासच नाही का? काय करतो, का करतो, कुठे करतो, जे करतो ते जीव धोक्यात घालू शकतो असे प्रश्न कोणालाही का पडत नसावेत ? थोडासा दोष फॉलोअर्सचा पण मानला जाऊ शकेल का? ज्ञानात भर टाकणारा, भारतीय संस्कृतीचा परिचय करून देणारा मजकूर टाकणारे प्रभावकही खूप आढळतात.
हे देखील वाचा : संपादकीय : २० जुलै २०२४ – वाचन सवयीच्या दिशेने टाकलेले पाऊल
जाणीवपूर्वक त्यांना फॉलो करावे असे किती लोकांना वाटत असावे? अश्लील, अतिरेकी, मूर्खपणा सिद्ध करणारा मजकूर टाकणाऱ्यांच्या तुलनेत आशयधन मजकूर टाकणाऱ्यांचे फॉलोअर्स कमी का आढळत असावेत? काहीतरी विचित्र केले तरच बघ्यांना आवडते आणि ते फॉलो करतात असा अनेकांचा भ्रम त्यामुळेही होत असावा का? असा हा सगळा गुंता आहे. जो सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी जाणते, समजूतदार युवा आणि जाणते प्रभावक, पालक आणि सरकार यांनी एकत्र येण्याची गरज आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा