Tuesday, March 25, 2025
Homeअग्रलेखसंपादकीय : २६ नोव्हेंबर २०२४ - जीवनगाणे गातच राहावे

संपादकीय : २६ नोव्हेंबर २०२४ – जीवनगाणे गातच राहावे

निवडणुकीतील विजयी उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आनंदात आहेत. प्रचाराच्या आणि विजयाच्या आठवणींचा त्यात समावेश आहे. कसा आणि किती प्रचार केला आणि विजय कसा साजरा केला याचीच चर्चा अजूनही झडत आहे. त्यांच्यासाठी ती गोष्ट मोठीच आहे. तथापि आनंद घेण्याची सवय अशी घटनाबद्ध असावी का? अमुक काही तरी घडले की आनंद मानणे हा मानवी स्वभाव बनला असावा. कदाचित त्यामुळेच बहुसंख्य माणसे एकतर भूतकाळात रमतात किंवा भविष्याची चिंता करताना आढळतात. परिणामी ते वर्तमानात जगणे आणि वर्तमानातील छोटे छोटे आनंदाचे क्षण गमावतात. याकडे मानसतज्ज्ञ लक्ष वेधून घेतात.

हे देखील वाचा- संपादकीय : २५ नोव्हेंबर २०२४ – महिलांच्या मानसिकतेवर प्रभाव 

- Advertisement -

दैनंदिन जगणे आणि उदरनिर्वाह याच्या धबडग्यात माणसे यंत्रवत बनली असे बोलले जाते. तथापि तसे न जगणे माणसांच्याच हातात आहे याचा विसर माणसांना पडला असावा. रोजच्या जगण्यातील असंख्य छोटे छोटे क्षण आनंद मिळवून देऊ शकतात. त्याच्यात आनंद शोधण्याची सवय जडली की मग आनंदाचे क्षण शोधावे लागत नाहीत. रोजचा सूर्योदय आणि सूर्यास्त देखील वेगळा भासू शकेल. टवटवीत उमलणारी फुले, रस्त्याने धावणारे कुत्र्याचे पिल्लू, एखाद्याच्या कडेवरचे गोंडस बाळ, अवचित कोणाची तरी झालेली काही मिनिटांची भेट, चविष्ट झालेला एखादा पदार्थ, रंगीबेरंगी वस्त्रे असे कितीतरी क्षण आनंद देऊ शकतील.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

अगदी रोजच्या कामात देखील माणसे आनंद शोधू शकतील. ‘रोजचे मरे, त्याला कोण रडे’ ही भावना नाहीशी होऊ शकेल. पण त्यासाठी माणसांचे मन रिकामे असायला हवे. ते तसे आहे का? माणसे मनात कितीतरी गोष्टी भरून ठेवतात. त्यात नकारात्मक कचराच जास्त आढळतो. माणसे नकोशा आठवणी उगाळतात. शालेय परीक्षेत कोण कोणास काय म्हणाले असा प्रश्न हमखास असायचा. त्याचे बरोबर उत्तर किती जणांना देता आले असावे? पण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कोण काय काय म्हणाले ते आयुष्यभर लक्षात ठेवण्याची सवय बहुसंख्यांना असते.

हे देखील वाचा – संपादकीय : २३ नोव्हेंबर २०२४ – प्रदूषणमुक्तीत राजकीय इच्छाशक्तीची उणीव 

अपमानाचे क्षण कधीही विसरत नसतो, ते कधी ना कधी परत करतो अशी शेखीही मिरवताना अनेक जण अवतीभवती आढळतात. मनाचे आणि शरीराचे दुखणे मागे लागण्यासाठी अशी परिस्थिती पोषक ठरते हेही माणसांच्या लक्षात येत नाही. मग माणसे दुखण्याचे मूळ रुग्णालयात शोधतात. त्याची वेगळी चिंता त्यांना घेरते. तथापि वर्तमानात जगणे, छोटे छोटे आनंद उपभोगणे जीवनाचे गाणे बनवू शकेल. मग ते गाणे गातच राहावे असे वाटू शकेल. कोणत्या गोष्टी धरून ठेवायच्या आणि कोणत्या सोडून द्यायचा याचा विवेक माणसांनाच करायला शिकावे लागेल. ‘माइंडफूल जगणे’ यालाच म्हणत असावेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...