Tuesday, March 25, 2025
Homeअग्रलेखसंपादकीय : २६ ऑक्टोबर २०२४ - खेळ हा मुलांचा हक्क

संपादकीय : २६ ऑक्टोबर २०२४ – खेळ हा मुलांचा हक्क

मुलांचे मैदानी खेळ संपत चालल्याची तक्रार सगळेच करतात. स्पर्धेचा ताण असल्याचे सांगत पालकांमध्येही मुलांच्या मैदानी खेळाविषयी अनास्था दिसून येते. मुलांनी खेळात वेळ वाया घालवू नये, अशीच अनेक पालकांची इच्छा असते. तथापि खेळातही करिअर घडू शकते. त्या दृष्टिकोनातून खेळाकडे पाहावे, केवळ खेळ म्हणून पाहू नये, असे मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी यांनी म्हटले आहे.

खेळाचा हा मुद्दा अनेकदा चर्चेत येतो. ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर यांनी खेळणे हा मुलांचा हक्कच मानला आहे. जाहीर व्यासपीठावरून बोलताना ते मुलांच्या खेळण्याचा नेहमीच पुरस्कार करतात. खेळात भविष्य घडू शकते. त्याची अनेक उदाहरणे सांगता येतील. पण सर्वांच्याच बाबतीत तसे घडू शकेल किंवा घडेल, असे सरसकट मानता येईल का? क्रीडा क्षेत्रही स्पर्धेला अपवाद नाही. परिणामी मुलांचे भविष्य खेळात घडण्याबाबत पालकवर्ग साशंक असेल तर ते समजण्यासारखे आहे.

- Advertisement -

मुलांनी कुठेही, अगदी खेळण्यातही वेळ वाया न घालवता अभ्यास करावा, असा त्यांचा आग्रहही समजून घेतला पाहिजे. तथापि मैदानी खेळांचे इतर काही फायदे सांगितले जाऊ शकतील. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला खेळ मदत करतात. विविध प्रकारच्या व्याधी अगदी लहान वयात जडत असण्याचा हा काळ असतो. मुलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्यात खेळ मोलाची भूमिका बजावतात.

दृढ निश्चय, नम्रता, परस्पर आदर, खिलाडूवृत्ती, लवचिकता असे महत्त्वपूर्ण मूल्य संस्कार खेळातूनच घडतात. खेळ हे पराभव आणि दुसर्‍याचा विजय सहज स्वीकारायला शिकवतात. भावनांचे नियमन शिकवतात. सद्यस्थितीत या मूल्यांचे महत्त्व वेगळे सांगायला नको. तात्पर्य, भविष्य घडवणे शक्य वाटू शकले नाही तरी चांगला माणूस घडण्यासाठी तरी मुलांना मैदानी खेळ खेळू दिले पाहिजेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...