Thursday, May 15, 2025
Homeअग्रलेखसंपादकीय : २९ जानेवारी २०२५ - स्तुत्य पुढाकार

संपादकीय : २९ जानेवारी २०२५ – स्तुत्य पुढाकार

आईचे दूध बाळासाठी अमृत आणि जन्मानंतरचे पहिले लसीकरणच मानले जाते. त्याची कारणेही नवजात बाळाच्या मातांना स्त्रीरोगतज्ज्ञ वेळोवेळी समजावून सांगतात.त्यात विविध प्रकारची पोषणमूल्ये असतात. बाळाचे आणि आईचे भावनिक बंध घट्ट करते. एवढेच नव्हे तर आईच्या प्रसूतीपश्चात आरोग्यासाठी देखील ते गरजेचे असते, असे स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणतात. अनेक मातांसाठी हा प्रवास साधा सोपा आणि सरळ असतो. प्रसंगी हा विषय चर्चेचा आणि समुपदेशनाचा ठरू शकतो, याचेच अनेकांना आश्चर्य वाटेल. तथापि काही जणींना त्यात समस्या असू शकतात. त्यांची नवजात बाळे आईच्या दुधापासून वंचित राहू नयेत, यासाठी राज्यात 26 ठिकाणी आईच्या दुधाची बँक चालवली जाते. एका स्वयंसेवी संस्थेने याकामी पुढाकार घेतला आहे.

- Advertisement -

या बँकेत साठवलेले दूध सहा महिन्यांपर्यंत वापरले जाऊ शकते, असे या संस्थेचे पदाधिकारी सांगतात. दरवर्षी सुमारे 22 हजार गरजू बाळांसाठी ही बँक दूध पुरवू शकते, अशी माहिती एका वृत्तपत्रात प्रसिद्ध बातमीत देण्यात आली आहे. हे झाले बाळांचे, पण अनेकदा नवजात मातांना स्तनपान करण्यात काही समस्या जाणवू शकतात. स्तनपानासाठी बैठक कशी असावी? हीदेखील अडचण मातांना जाणवत असेल. गर्भारपण आणि बाळंतपण याविषयी जाहीर चर्चा करण्यात महिलांच्या मनात संकोच असतो. स्तनपानाशी संबंधित समस्या कोणाशी बोलाव्यात, असाही प्रश्न अनेकींना सतावतो. काही गैरसमज आढळतात. त्यावर महिलांनीच एकत्र येऊन उत्तर शोधले आहे. ‘बेस्ट फिडींग सपोर्ट फॉर इंडियन मदर’ ही संस्था यासाठी काम करते.

समाजमाध्यमांवर हजारो माता या संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत. ही संस्था स्तनपानाबाबत जागरूकता निर्माण करते. समस्यांवर उपाय सुचवते, समुपदेशन करते. असे पुढाकार महिलांच्या मनातील अनेक विषयांवरचे संकोच कमी करू शकतात. गर्भारपण, बाळंतपण आणि स्तनपान हा जिचा तिचा वैयक्तिक विषय मानला जातो. दिवस गेल्याचे समजल्यावर आणि बाळ जन्माला आल्यावर अभिनंदन करणे इथपर्यंतच तो सामाजिक झाल्याचे आढळते. परिणामी त्याविषयी जाहीर वाच्यता करणे महिलांच्या मनात संकोच निर्माण करू शकेल, पण तो अनेकार्थांनी सामाजिक विषय ठरू शकेल. म्हणूनच कदाचित त्यासाठी अनेक सरकारी योजना राबवल्या जातात. सुदृढ बाळांच्या स्पर्धा घेतल्या जातात. सुदृढ आणि निरोगी बाळे ही एका अर्थाने कौटुंबिक व सामाजिक संपत्ती ठरू शकतील. आईचे दुग्धपान ही बाळाच्या सुदृढतेच्या पायाभरणीची पहिली पायरी ठरू शकेल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...