नाशिक । प्रतिनिधी Nashik
दैनिक ‘देशदूत’चे संस्थापक देवकिसन सारडा उर्फ मोठे भाऊ यांच्या निधनाचे वृत्त समजताच उद्योग व सामाजिक क्षेत्रातून मान्यवरांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. सह्याद्री रुग्णालयात दुपारी 2.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी 6 वाजता त्यांच्या निवासस्थानावरुन त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी उद्योग, सामाजिक, राजकिय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
त्यांच्या पार्थीवावर नाशिक अमरधाम येथील विद्यूत दाहीनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी झालेल्या शोकसभेत उद्योजक रामेश्वर कलंत्री, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, अॅड.भगीरथ शिंदे, जयप्रकाश जातेगावकर यांनी मोठ्या भाऊंच्या आठवणींना उजाळा देत श्रंद्धांजली अर्पण केली.
यावेळी बोलताना आपण स्वत:ला भाग्यवान समजतो कारण मोठ्या भाऊंचा वडील म्हणून आपल्याला वयाच्या 72 वर्षापर्यंत सहवास लाभला आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीतून दररोजच नवीन वस्तूपाठच मिळत गेल्याचे त्यांचे ज्येष्ठ पूत्र रामेश्वर सारडा यांनी शेवटी सांगितले. यावेळी उद्योग सामाजिक, राजकिय कला क्रिडा क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्यने उपस्थित होते.
उद्या उठावणा
स्व. देवकिसन सारडा यांच्या स्मृत्यर्थ उद्या त्यांच्या निवासस्थानी सायंकाळी 4 वाजता उठावणा ठेवण्यात आला आहे. त्यानंतर 4.30 ते 6.30 दरम्यान प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे.