Thursday, June 13, 2024
Homeनाशिकइगतपुरी तालुक्यातील सात धरणांनी गाठला तळ; नेमका पाणीसाठा किती..जाणून घ्या

इगतपुरी तालुक्यातील सात धरणांनी गाठला तळ; नेमका पाणीसाठा किती..जाणून घ्या

जाकीर शेख । घोटी

- Advertisement -

इगतपुरी तालुक्यात सात मोठी धरण आहे. मात्र यावर्षी उन्हाची लाई लाई व तापमान बघता आणि पाऊसाचे प्रमाण कमी या दोन्ही समीकरणाने तालुक्यातील. सात धरणानी अक्षरशः तळ गाठला आहे. त्यामुळे जून महिन्यात पाऊस पडला नाहीतर दुष्कळाला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.

सात मोठे जलप्रकल्प असलेल्या इगतपुरी तालुक्यात उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात 15 टँकरद्वारे एकूण 16 गावे व 48 वाड्यांना पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. धरणांच्या तालुक्यातच तसेच अर्धा महाराष्ट्राला पाणीपुरवठा करणाऱ्या तालुक्यातील वाड्या पाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. कुठे गेल्या शासनाच्या जलजीवन योजना, आणि कधी येणार नळाद्वारे घरापर्यंत पाणी असा प्रश्न आदिवासी वाड्यापाड्यातील महिला वर्गांकडून व्यक्त होत आहे.

हर घर नल का जल हीच का सरकारची जलजीवन मिशन सफल झाली का? असा प्रश्न ग्रामीण भागातील महिलांकडून उपस्थित केला जातो आहे. इगतपुरी तालुक्यातील भावली, भाम दारणा, कडवा व वाकी या धरणामध्ये शून्य टक्के पाणी साठा असून धरणारलागतच्या गावानाच पिण्याच्या पाण्या पासून वंचीत आहे. धरणातील जलसाठा संपुष्टात आला असून, आता मृत जल साठ्यावर येथील जलाशयाची मदार आहे. तर भावली धरणात अवघा शून्य टक्के साठा शिल्लक राहिल्याने पावसाला विलंब झाला तर तालुक्यातील अनेक गावांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

विशेष व उल्लेखनीय बाब म्हणजे धरणालगतच्या असलेल्या वाड्या पाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. धरणात पाणी दिसत असतानाही उशाशी असलेल्या वाड्यापाड्यांना मात्र टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असल्याची खंत अनेक वाड्यांना जाणवते. भाम धरणालगत असलेल्या मांजरगावच्या दोन वाड्या भरवज निरपनची वाडी, काळूस्तेची दरेवाडी, त्रिंगलवाडीचा बंधारा रिकामा झाल्याने त्रिंगलवाडीसह पाच वाड्यांना याबरोबरच वाकी धरणालगत असलेल्या वाळविहीर परिसरातील सहावाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. याबरोबरच खैरगावच्या दोन वाड्या शेवगेडांग दोन वाड्या, कुरुंगवाडीची एक वाडी, आंबेवाडीच्या दोन वाड्या, बलायदुरीची एक वाडी वासाळीची एक वाडी, आवळखेड, बळवंतवाडी तसेच गरुडेश्वरच्या चार वाड्या, मायदरासह दोन वाड्या, खेडच्या दहा वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

इगतपुरी तालुक्यात 15 टँकरद्वारे 41 फेऱ्यांच्या माध्यमातून 16 गावे व 48 वाड्यांना पिण्याचे पाणी पुरविले जाते असल्याची माहिती प्रशासनाने दिली. दरम्यान दरवर्षी यातील बहुतांश वाड्यापाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो त्यामुळे टँकरमुक्त तालुका व हंडामुक्त गावे ही संकल्पना, घोषणा कागदावर आहेत की काय असा सवाल व्यक्त होत आहे या वाड्या पाड्यांना जलजीवन योजनेच्या माध्यमातून कायमस्वरूप योजना राबविण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी सकारात्मक पुढाकार घेणे अपेक्षित आहे

तालुक्यातील सर्वच धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरली होती त्यात कालांतराने रोटेशनच्या माध्यमातून बहुतांश धरणातील पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे धरणातील बहुतांश जलसाठा कमालीचा घटला होता. आज स्थितीत तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या भाम, भावली वाकी दारणा धरणातील जलसाठा संपुष्टात आला असून आता मृत साठ्यावर अवलंबून राहावे लागणार आहे तर भावली धरणात अवघा शून्य टक्के जलसाठा शिल्लक राहिल्याने आगामी काळात पावसाने विलंब केला तर तालुक्याची चिंता वाढण्याची शक्यता आहे. तसेच कडवा प्रकल्पातही केवळ ९ टक्के पाणी शिल्लक आहे.

इगतपुरी तालुका हा सर्वाधिक पर्ज्यनामान असलेला तालुका म्हणून ओळखला जातो मात्र दिवसेंदिवस तालुक्यातील पर्ज्यनमानात घट होत आहे यामध्ये सर्वाधिक. सण २०१९ मध्ये जून महिन्यापासून ते सप्टेंबर पर्यंत ५५५३ मिमी सर्वाधिक पाऊस पडला होता त्यानंतर पुढील जी आकडेवारी ही ती कमीच होताना दिसत आहे सण २०२० मध्ये ३८८० मिमी पाऊसाची नोद झाली होती तर २०२१ मध्ये ३६२६ मिमी ची नोंद झाली होती तर सन २०२२ मध्ये विक्रमी ५२२१ मिमी पाऊस पडला होता तर २०२३ मध्ये ३४९४ मिमीची नोंद झाली आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या