Saturday, July 27, 2024
Homeनाशिकजिल्ह्यातील 'इतक्या' हेक्टरवरील शेतमालाचे नुकसान

जिल्ह्यातील ‘इतक्या’ हेक्टरवरील शेतमालाचे नुकसान

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात झालेल्या बेमोसमी अवकाळी व विजांच्या गडगडटासह झालेल्या पावसामुळे (rain) जिल्ह्यातील 191 गावातील 2798 शेतकऱ्यांच्या (farmers) शेतातील उभ्या पिकांना फटका (crop damage) बसला आहे.

- Advertisement -

रविवारी (दि.५) मध्यरात्री नंतर वीज पडून नांदगाव तालुक्यात (nandgaon taluka) एक गाय, एक म्हैस, निफाड (niphad) व दिंडोरी (dindori) तालुक्यात प्रत्येकी एक गाय अशा एकूण चार पशुधनाला शेतकऱ्यांना मुकावे लागले आहे. जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार सोसाट्याचा वारा व पावसाने रब्बी हंगामाला (rabbi season) फटका बसला आहे. जिल्ह्यातील 2685.35 हेक्टरवरील शेतमालाचे नुकसान झाले आहे.

याची झळ 191 गावातील २७९८ शेतकऱ्यांना बसली आहे. यामध्ये कळवण तालुक्यात (kalwan taluka) टोमॅटो 3.50 हेक्टर, भाजीपाला 7.25 हेक्टर असे एकूण 10.75 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. नाशिक तालुक्यात कांदा 61.50 हेक्टर, गहू 58.30 हेक्टर,भाजीपाला 29.80 हेक्टर, द्राक्ष 117 हेक्टर तर आंबा 0.80 हेक्टर असे एकूण 267.40 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात आंब्याचे दोन हेक्टर क्षेत्रावरील आंब्याचा मोहर गळून पडल्याने नुकसान झाले आहे. निफाड तालुक्यात द्राक्ष व गव्हाला फटका बसला असून 660 हेक्टर वरील द्राक्ष तर १७४५ हेक्टर वरील गव्हाला फटका बसला आहे.

निफाडला सर्वाधिक फटका

निफाड तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच 2405 हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. यामध्ये द्राक्ष 660 हेक्टर तर 1725 हेक्टरवरील गव्हाचे नुकसान झाले आहे. याप्रमाणे जिल्ह्यात एकूण 2685.35 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे.

तीन गायी, एक म्हैस दगावली

जिल्ह्यात तीन गाईंचा वीज पडून तर एका म्हशीचा वीज पडून मृत्यू झाला आहे. यामध्ये नांदगाव निफाड व दिंडोरी तालुक्यात प्रत्येकी एका गायीचा तर नांदगाव तालुक्यात एका म्हशीचा मृत्यू झाला. मालेगाव,सटाणा, नांदगाव, देवळा, दिंडोरी, सुरगाणा, पेठ, इगतपुरी, सिन्नर, चांदवड व येवला या तालुक्यात नुकसान झाले नसल्याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातर्फे देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या