Saturday, July 27, 2024
Homeनाशिकअवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान

अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान

नाशिक । प्रतिनिधी | Nashik
 

तालुक्यात झालेला मुसळधार अवकाळी पाऊस (Unseasonal rain) आणि वाऱ्यामुळे महिरावणी परिसरातील द्राक्ष, गहू आणि  हरभरा या पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. या पावसात महिरवणीतील शेतकरी सुदाम खांडबहाले यांच्या तीन एकर द्राक्ष (grapes) बागेचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

पहाटे एक-दीड वाजेच्या  सुमारास  पाऊस सुरू होताना प्रचंड वाऱ्याबरोबर गारा पडल्या. त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे द्राक्षाचे घड आणि मनी गळून पडले आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं.

महाराष्ट्रात ईडीची मोठी कारवाई; १५ ठिकाणी छापेमारी

ज्ञानेश्वर खांडबहाले (Dnyaneshwar Khandbahale) यांनीही मोठया कष्टाने उभा केलेला गहू पूर्णपणे आडवा झाल्याचं सांगितले. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच  मोठ्या प्रमाणात नुकसान केल, जिल्ह्यातील सर्वात मोठे पीक म्हणून द्राक्ष पिक ओळखलं जातं, बागायतदारांचं हाता-तोंडाशी आलेलं पीक अस्मानी संकटांन ओढावून नेल्याने शेतकरी बेजार झाला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

“शेतात रानडुकरांचा (wild boars) मोठा त्रास आहे. त्यांच्यापासून कसेबसे द्राक्ष वाचवले. रात्र जागून या रानडुकरांवर आम्ही लक्ष ठेवतो. कष्ट घेऊन उभे केलेले हे पीक पूर्णपणे उध्वस्त झाल्याने, घेतलेले कर्ज आणि उसनवारीचे पैसे द्यायचे कसे असा प्रश्न आहे. सरकारने यात लक्ष घालून मदत करावी.”

–  सुदाम खांडबहाले – शेतकरी (Sudam Khandbahale)

- Advertisment -

ताज्या बातम्या