Thursday, March 27, 2025
Homeनगरशेवगावमध्ये बंधारे, पाझर तलावांसाठी पावणे आठ कोटींचा निधी

शेवगावमध्ये बंधारे, पाझर तलावांसाठी पावणे आठ कोटींचा निधी

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

शेवगाव-पाथर्डी तालुक्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. यावेळी नद्यांना मोठ्या प्रमाणात आलेल्या पुरामुळे साठवण बंधारे, कोल्हापूर टाईप बंधारे, सिमेंट नाला बांध तसेच पाझर तलाव यांची मोठी फुटतूट झाली. सर्वांच्या दुरूस्तीसाठी 7 कोटी 77 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये शेवगावसाठी 5 कोटी 25 लाख रुपयांचे तर पाथर्डी तालुक्यासाठी 2 कोटी 52 लाखांचा निधीचा समावेश असल्याची आ.मोनिका राजळे यांनी दिली.

- Advertisement -

यावेळी आ. राजळे म्हणाल्या, प्रादेशिक जलसंधारण विभाग, नाशिक यांनी मतदारसंघातील 81 दुरुस्ती कामांचा प्रस्ताव सादर करण्यात आले होते. याकामी जलसंधारण मंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने मुख्यमंत्री जलसंधारण योजने अंतर्गत मृद व जलसंधारण विभागांतर्गत मतदारसंघात दुरुस्तीच्या कामांमध्ये पाथर्डी तालुल्यातील येळी, भुतेटाकळी 2 कामे, कोळसांगवी, कोरडगाव 2 कामे, खेर्डे, मालेवाडी, मिडसांगवी, मोहोज, पागोरी पिंपळगाव, प्रभुपिंपरी2 कामे, शेकटे 3 कामे, अकोला 6 कामे, सुसरे 2 कामे, भालगाव, सोनोशी, सोमठाणे नलवडे 3 कामे, दुलेचांदगाव, चिंचपूरइजदे, मोहटे, तिनखडी 3 कामे, पाथर्डी (वनेश्वर), भवरवाडी, मिडसांगवी, पिंपळगव्हाण 2 कामे, हाकेवाडी, रुपनरवाडी, मुंगसवाडे या गावांचा समावेश आहे. तर शेवगाव तालुक्यातील वडुले 6 कामे, मलकापूर, वरूर 2 कामे, सुकळी, खरडगाव 2 कामे, ठाकुर पिंपळगाव 3 कामे, लाडजळगाव, मडके, भगूर , आखेगाव, अंतरवाली बुद्रुक 3 कामे, लखमापुरी 2 कामे, हातगाव 2 कामे, चेडेचांदगाव 4 कामे, सुळे पिंपळगाव 2 कामे, मुरमी 2 कामे, लोळेगाव, सुकळी, ढोरजळगाव 2 कामे या गावांतील दुरुस्तीचे कामांचा समावेश आहे. मतदारसंघातील पाझर तलाव आणि बंधारे दुररूस्तीसाठी 7 कोटी 77 लाख रुपयांचा भरीव निधी दिल्याबद्दल जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे आ. राजळे यांनी आभार मानले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २७ मार्च २०२५ – उभारी देणारा उपक्रम

0
कोणत्याही सरकारी व्यवस्थांवर-सेवांवर सामान्यतः टीकाच केली जाते. विशेषतः सार्वजनिक आरोग्यसेवेचा उल्लेख केला तरी असंख्य तक्रारींचा पाऊस पडल्याचे अनेकदा आढळते. तथापि ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचा एक...