Monday, November 18, 2024
Homeजळगावदाणाबाजार माथाडी-हमाल कामगार सेनेची राजूमामा भोळे यांना साथ

दाणाबाजार माथाडी-हमाल कामगार सेनेची राजूमामा भोळे यांना साथ

जळगाव । प्रतिनिधी –
जळगाव शहरातील दाणा बाजार माथाडी हमाल व जनरल कामगार सेनेतर्फे महायुतीचे उमेदवार आमदार राजूमामा भोळे यांना विधानसभा निवडणुकीत साथ देत मतदानाच्या दिवशी हमाली बंद राहील, असे आश्वासन दिले आहे. दाणा बाजारातील माथाडी हमाल कामगार, हातगाडी कामगार, दुकानातील कामगारांनी आ. राजूमामा भोळे यांना साथ देण्यासाठी मतदानाच्या दिवशी मतदान करता यावे यासाठी हमाली कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच शहरातील इतर संघटनेतील हमाली कामगारांनी देखील आपले कामकाज बंद ठेवून मतदानाचे कर्तव्य बजवावे, असे आवाहन केले आहे. मतदान करणे हा राष्ट्रीय अधिकार असून प्रत्येक हमाल बांधवाने आपल्या कुटुंबीयांसह मतदान करावे, असे आवाहन दाणा बाजार माथाडी हमाल व जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष शेषराव वलकर यांनी केले आहे.

- Advertisement -

जळगाव जिल्हा मूकबधिर असोसिएशन पाठिशी
जळगाव येथील जळगाव जिल्हा मूकबधिर असोसिएशनने महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना साथ देत पाठीशी उभे राहून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा मानस व्यक्त केला आहे. यापूर्वी आपण केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा आढावा घेऊन मतदार संघातील नागरिकांचे विविध प्रश्न आपण मार्गी लावले आहेत. तर भविष्यात शहरातील मूकबधिर, कर्णबधिर दिव्यांगांचे जिव्हाळ्याचे प्रश्न आपण सोडवू शकाल, अशी आम्हाला खात्री आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ आम्हाला मिळेल म्हणून आम्हाला आपल्यासारख्या कर्तव्यदक्ष व कृतीशील आमदाराची आवश्यकता आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या