Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरधोकादायक इमारत पाडण्यास पुन्हा सुरूवात

धोकादायक इमारत पाडण्यास पुन्हा सुरूवात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील धोकादायक इमारतींवर महापालिकेमार्फत पुन्हा एकदा कारवाई सुरू झाली आहे. मंगळवारी मनपाच्या बांधकाम विभागाने हलवाई गल्ली येथील एका धोकादायक इमारतीची जीर्ण झालेली भिंत उतरवून घेतली.

- Advertisement -

आयुक्तांच्या आदेशानुसार मागील काही दिवसांपूर्वी मनपाने शहरातील पाच ते सहा धोकादायक इमारतींवर कारवाई करून त्या उतरवून घेतल्या. इतर इमारतींना नोटीस बजाविण्यात आलेल्या आहेत. काही ठिकाणी जागा मालक व भाडेकरू असे वाद असल्याने कारवाईत अडचणी येत आहेत.

मात्र, ज्याठिकाणी न्यायालयीन वाद नाहीत, अशा ठिकाणची धोकादायक इमारतीची बांधकामे उतरवून घेण्यात येत आहेत. बांधकाम विभाग व अतिक्रमण विभागाच्यावतीने मंगळवारी सतरंगी मस्जिद येथील धोकादायक व पडलेली भिंत उतरवून घेण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या