पेठ | प्रतिनिधी Peth
पेठ शहराच्या बाहेरून जाणारा बायपास रस्त्यावर पुलाजवळच खड्डा पडला आहे. सदर बायपास रस्ता हा वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने जागरूक ग्रामस्थांनी ही बाब आज दुपार नंतर तहसिलदार यांचे निर्दशनास आणून दिली.
- Advertisement -
नंतर संभाव्य धोका ओळखून बायपासवरील वाहतुक बंद करुण पेठ शहरातून वाहतुक सुरु करण्यात आली . पेठ शहराचे बाहेरून तहसिल कार्यालयासमोर मुख्य रस्त्यास जोडलेल्या रस्त्यावरील बायपासवरील रस्त्याचे काम नुकतेच संपलेले असतांना अल्पावधीतच धोकादायक खड्डा पडल्याने रस्त्याचे दर्जा बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.