Thursday, September 19, 2024
Homeनगरदारणा, भाम निम्मे भरले !

दारणा, भाम निम्मे भरले !

भावली 62 टक्क्यांवर तर गंगापूरचा साठा स्थिर

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

सह्यद्रीच्या घाटमाथ्यावर अधुन मधून येणार्‍या सरींनी दारणात कमी अधिक प्रमाणात पाण्याची आवक सुरु असल्याने काल सकाळी दारणा धरण निम्मे भरले! भाम धरणही निम्मे भरले. भावली 62.06 टक्क्यांवर तर गंगापूरचा साठा 33.66 टक्क्यांवर स्थिर आहे. काल पावसाने उघडीप दिली होती. मात्र काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासात दारणाच्या पाणलोटातील घोटी येथे 30 मिमी, इगतपुरी येथे 47 मिमी, दारणाच्या भिंतीजवळ 10 मिमी पावसाची नोंद झाली. मागल 24 तासात दारणात 34 दलघफू नविन पाणी दाखल झाले.

काल सकाळी दारणा 49.95 टक्के झाले होते. 7149 दलघफू क्षमतेच्या या धरणात 3571 दलघफू पाणीसाठा झाला आहे. दारणाच्या वरील भावली काल सकाळी 62.06 टक्क्यांवर पोहचले. भावलीला काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासात 66 मिमी पावसाची नोंद झाली. भावलीत 24 दलघफू नविन पाणी दाखल झाले.1434 क्षमतेच्या या धरणात 890 दलघफू पाणी साठा आहे. मुकणे धरण 16.04 टक्के, वाकी 11.12 टक्के, भाम 50.77 टक्के, वालदेवी 24.36 टक्के असे साठे आहेत. काल सकाळी मागील 24 तासात मुकणे येथे 6 मिमी, वाकीला 21 मिमी, भामला 42 मिमी असा पाउस नोंदला गेला.

गंगापूर धरणाचा साठा मागील काही दिवसांपासुन स्थिर आहे. काल सकाळी मागील 24 तासात या धरणात पाणी आलेच नाही. हे धरण 33.66 टक्के इतके भरलेले आहे. कश्यपी 11.93 टक्के, गौतमी गोदावरी 28.21 टक्के, कडवा 45.85 टक्के, आळंदी 2.82 टक्के भरले आहे. गंगापूरच्या पाणलोटातील अंबोली येथे 10 मिमी, त्र्यंबक येथे 12 मिमी पावसाची काल सकाळी नोंद आहे. अन्यत्र पाऊस नगण्य आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या