Thursday, May 22, 2025
Homeनगरदारणाच्या पाणलोटात पावसाचा जोर

दारणाच्या पाणलोटात पावसाचा जोर

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

काल दारणाच्या पाणलोटात दुपारनंतर पावसाचे जोरदार आगमन झाले. पावसाने दोन तासानंतर पुन्हा विश्रांती घेतली. दारणा काल 56 टक्क्यांवर, भावली 62 टक्क्यांवर पोहचले. तर मुकणे निम्मे भरले आहे.

काल दारणाच्या परिसरात पावसाने उघडीप दिली होती. परंतू दुपारी 3 वाजेनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. दारणाच्या पाणलोटातील घोटी, इगतपुरीच्या घाटमाथ्यावर दमदार हजेरी लावली. दारणाच्या भिंतीजवळही पावसाने हजेरी लावली. गेल्या आठवडाभरापेक्षा काल काहिसा पावसाचा जोर घाटमाथ्यासह अन्य धरणांंच्या पाणलोटातही वाढला. नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्याशी निगडीत असलेल्या धरणांच्या जलाशयात पाणी वाढते आहे. मात्र अन्य धरणांच्या पाणलोटात अद्यापि समाधानकारक पाऊस नाही. नाशिक चा दारणा समुह व नगर जिल्ह्यातील भंडारदरा 15 ऑगस्ट पुर्वी ओव्हरफ्लो होवू शकतील अशी सध्याची परिस्थती आहे.

दारणाचा साठा काल सकाळी 56 टक्क्यांपर्यंत पोहचला होता. 7149 क्षमतेच्या दारणात 3970 दलघफू पाणीसाठा आहे. 7 टिएमसी च्या या धरणात 4 टिएमसी पाणीसाठा झाला होता. मुकणे धरणात 50.12 टक्के पाणी साठा तयार झाला आहे. भावली धरण 62 टक्क्यांवर पोहचले आहे.

गंगापूर धरण समुहाची स्थिती फारशी समाधानकारक नाही. गंगापूर धरणात 38.49 टक्के पाणीसाठा आहे. या धरणांच्या समुहातील कश्यपी 20.90 टक्के, गौतमी गोदावरी 15.31 टक्के, असा पाणीसाठा आहे. कडवात 25.36 टक्के, आळंदीत 4.29 टक्के पाणीसाठा आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये मागील वर्षी कालच्या तारखेला 73.04 टक्के पाणीसाठा होता. काल मात्र हा साठा अवघा 34.38 टक्के आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dhule News : अबब…! शासकीय विश्रामगृहात सापडले कोट्यवधींचे घबाड; माजी आमदाराचा...

0
धुळे | Dhule शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी धुळ्याच्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहात (Gulmohar Government Rest House) आमदारांना (MLA)...