Sunday, September 8, 2024
Homeनगरदारणा 60 टक्के तर भावली 65 टक्क्यांवर!

दारणा 60 टक्के तर भावली 65 टक्क्यांवर!

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

दारणाच्या पाणलोटातील घोटी, इगतपूरी च्या घाटमाथ्यावर पावसाचे मध्यमस्वरुपाचे आगमनात सातत्य आहे. त्यामुळे पाण्याची आवक सुरु असल्याने काल दारणा 60 टक्क्यांवर पोहचले होते. मुकणे 52 टक्क्यांवर तर भावली 65 टक्के भरले आहे.

- Advertisement -

काल दिवसभरात अधुनमधून दारणाच्या पाणलोटातील घोटी, इगतपूरी च्या घाटमाथ्यावर पावसाचे आगमन होत होते. काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासात दारणाच्या जलाशयात 251 दलघफू नविन पाणी दाखल झाले. त्यामुळे 7149 दलघफू क्षमतेच्या दारणात 4313 दलघफू पाणी साठा काल सकाळी झाला होता. 1 जून पासुन दारणात साडेतीन टिएमसी पाणी नव्याने दाखल झाले. काल दारणाच्या भिंतीजवळ अवघा 5 मिमी पावसाची नोंद झाली. तर पाणलोटातील इगतपूरी येथे 32 मिमी, भावलीला 30 मिमी पावसाची नोंद झाली. भावली प्रकल्पातही 65 टक्के पाणी साठा तयार झाला आहे.

1434 दलघफू क्षमता असलेल्या धरणात 931 दलघफू पाणीसाठा आहे. हे धरण 100 टक्के भरल्यानंतर त्याच्या सांडव्यावरुन विसर्ग दारणा धरणाच्या दिशेने सुरु होतो. मुकणे धरणात 64.92 टक्के पाणी साठा आहे. 7239 दलघफू क्षमतेच्या या धरणात 3759 दलघफू पाणीसाठा आहे. काल सकाळी मागील 24 तासात या धरणात 33 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. या हंगामात आता पर्यंत 1151 दलघफू नविन पाणी दाखल झाले. दारणा समुहातील वाकीत 10.23 टक्के, भाम मध्ये 31.21 टक्के असा साठा आहे.

गंगापूर धरणाच्या पाणलोटात अधुनमधून हालक्या सरी दाखल होत आहे. या धरणाच्या पाणलोटात फारसा समाधानकारक पाऊस नाही. 1 जून पासुन या धरणात अर्धा टिएमसी नविन पाणी दाखल झाले. गंगापूर 40.21 टक्के भरले आहे.5630 क्षमतेच्या या धरणात 2264 दलघफू पाणीसाठा आहे. या धरणाच्या समुहातील कश्यपी 22.14 टक्के, गौतमी गोदावरी 17.13 टक्के, कडवा 28.67 टक्के, आळंदी 5.51 टक्के असा साठा आहे. 20 जुलै नंतर सर्वदूर पावसाचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या