Saturday, September 14, 2024
Homeनगरदारणा निम्मे! भावली 55 टक्के

दारणा निम्मे! भावली 55 टक्के

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

घाटमाथ्यावरील पावसाने काल उशीरा दारणातील पाणीसाठा 50 टक्के झाला! भावलीचा साठा 55.37 टक्क्यांवर गेला. तर गंगापूरचा साठा 34 टक्क्यांवर गेला आहे. मान्सून इतरत्र थांबला असला तरी नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचे मध्यम स्वरुपाचे आगमन होत आहे. त्यामुळे दारणा, भावली व इगतपुरी तालुक्यातील छोट्या मोठ्या प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक होत आहे. दारणाच्या भिंतीजवळ अधूनमधून रिमझिम पावसाचे आगमन होत आहे. इगतपुरीला काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासांत 25 मिमी पावसाची नोंद झाली.

भावलीला 36 मिमी पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर काहिसा कमी झाला असला तरी घाटमाथ्यावरील झरे, धबधबे कोसळू लागल्याने पाणी धरणांच्या जलाशयात विसावत आहे. काल सकाळी 6 वाजता मागील 24 तासांत दारणात 181 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. 1 जूनपासून काल सकाळपर्यंत दारणात 2704 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. 7149 दलघफू क्षमतेच्या दारणात काल सकाळी 3565 दलघफू पाणीसाठा झाला. दिवसभरात यात वाढ होऊन दारणा 50 टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. भावलीला 55.37 टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. 1434 दलघफू क्षमतेच्या भावलीत 794 दलघफू पाणीसाठा तयार झाला आहे.

मूकणे धरणाचा पाणी साठा आज 50 टक्के होईल. या धरणात काल सकाळी 49.19 टक्के पाणीसाठा आहे. मुकणेच्या भिंतीजवळ 12 मिमी पावसाची नोंद झाली. वाकी धरण 5.50 टक्के भरले. तेथे काल सकाळ पर्यंत 30 मिमी पावसाची नोंद झाली. भाम 23.90 टक्के भरले. तेथे काल सकाळी 14 मिमी पावसाची नोंद झाली. वालदेवी 20.04 टक्के आहे.

गंगापूर धरण परिसरात दारणाच्या 25 टक्केच पाऊस आहे. गंगापूरमध्ये 1 जून पासुन अवघे 249 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. 5630 क्षमतेच्या या धरणात 1906 दलघफू पाणीसाठा आहे. मागील वर्षी कालच्या तारखेला 3109 दलघफू पाणी साठा होता. यंदा पावसाने फारसे मनावर घेतले नाही. या धरणात 33.85 टक्के पाणी साठा आहे. कश्यपी मध्ये 17.49 टक्के, गौतमी गोदावरी मध्ये 12.96 टक्के, कडवा मध्ये 22.93 टक्के, आळंदीत 2.33 टक्के असा पाणीसाठा आहे. सर्वच धरणांना मुसळधार पावसाचे वेध लागले आहेत.

भंडारदरा पाणलोटात पावसाचा जोर ओसरला

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्याची जिवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण पाणलोटातील पावसाचा जोर ओसरल्याने आवकही मंदावली आहे. पाणीसाठा 63 टक्क्यांच्या पुढे सरकला आहे. तर निळवंडे धरणातीलही पाणीसाठा 27 टक्क्यांवर गेला आहे. काल अवघे 40 दलघफू नव्याने पाणी दाखल झाले. तर काल दिवसभरात पडलेल्या पावसाची नोंद भंडारदरात केवळ 5 मिमी झाली आहे.

11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सोमवारी सायंकाळी पाणीसाठा 6967 दलघफू (63.11 टक्के) झाला होता. तर काल सकाळी निळवंडेतील पाणीसाठा 2189 दलघफू झाला होता.

भंडारदरा परिसरात आता पाऊस कमी झाल्याने 112 दलघफू क्षमतेचा वाकी तलावातून सोडण्यात येणारा ओव्हरफ्ला 506 क्युसेकवर आला आहे. मुळा पाणलोटातही पाऊस कमी झाला आहे.

गत 24 तासांत झालेला पाऊस (मिमी)-भंडारदरा 47, घाटघर 56, पांजरे 49, रतनवाडी 66, वाकी 37.

- Advertisment -

ताज्या बातम्या