Saturday, June 15, 2024
Homeनगरदारणातून 3020 क्युसेकने विसर्ग, गोदावरी वाहती

दारणातून 3020 क्युसेकने विसर्ग, गोदावरी वाहती

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

दारणाच्या पाणलोट गेल्या दोन दिवसांपासून मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे. त्यामुळे दारणात नवीन पाण्याची आवक पुन्हा होऊ लागली आहे. त्यामुळे दारणातून सोडण्यात येत असलेला विसर्ग 3020 क्युसेक करण्यात आला आहे. नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत 1600 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता.

काल सकाळपर्यंत मागील 24 तासांत दारणात 154 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. काल दारणाच्या पाणलोटातील इगतपुरी येथे 37 मिमी पावसाची नोंद झाली. दारणाच्या भिंतीजवळ 10 मिमी पावसाची नोंद झाली. भावलीला 34 मिमी पावसाची नोंद झाली. घोटी परिसरातही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे घाटमाथ्यावरील धबधबे पुन्हा फेसाळू लागले आहेत. सलग तीन दिवसांपासून पावसाचे आगमन अधून मधून होत आहे. काल सकाळी दारणा 96 टक्क्यांवर पोहचले होते.

या धरणातून काल सकाळी 6 वाजता 2252 क्युसेक ने विसर्ग सुरु होता.त्यात दुपारी 2 वाजता वाढ करुन तो 3020 क्युसेक इतके करण्यात आले. दारणातील विसर्ग 400 क्युसेक इतका होता, 26 ऑगस्ट पासून त्यात वाढ करत तो सुरुवातीला 1100 करण्यात आला. 26 रोजी दुपारी 1500 क्युसेक इतका करण्यात आला. त्या दिवशी रात्री 9 वाजता त्यात वाढ करुन 1600 क्युसेक व रात्री 10 वाजता 2252 क्युसेक वर नेण्यात आला. त्यानंतर तो काल दुपारी 2 वाजता 3020 क्युसेक इतका करण्यात आला.

गंगापूर धरणाचा साठा 91.30 टक्क्यांवर स्थिर आहे. या धरणातून विसर्ग बंद आहे. काल या धरणाच्या भिंतीजवळ सकाळी मागील 24 तासात 25 मिमी पावसाची नोंद झाली. त्र्यंबक 15 मिमी, अंबोलीला 37 मिमी पावसाची नोंद झाली. कश्यपीला 16 मिमी, गोदावरीला गौतमीला 11 मिमी असा पाऊस नोंदला गेला. गंगापूर मध्ये मागील 24 तासांत 5 दलघफु नवीन पाणी दाखल झाले.

अन्य धरणांचे साठे असे- मुकणे 77.52 टक्के, वाकी 62.84 टक्के, भाम 100 टक्के, भावली 100 टक्के, वालदेवी 100 टक्के, कश्यपी 61.23 टक्के, गौतमी गोदावरी 58.40 टक्के, कडवा 82.46 टक्के, आळंदी 83.58 टक्के.

विसर्ग असे – भाम मधुन 559 क्युसेक, भावलीतुन 135 क्युसेक, वालदेवीतुन 65 क्युसेक, नांदूरमधेश्वर बंधार्‍यातुन गोदावरीत 551 क्युसेक ने विसर्ग सुरु होता काल दुपारी वाजता तो 1600 क्युसेक इतका करण्यात आला. तो उशीरा पर्यंत स्थिर होता.

गोदावरीत अवघा 5.8 टीएमसीचा विसर्ग !

धरणांच्या पाणलोटासह यंदा लाभक्षेत्रातही पावसाचे प्रमाण अल्प राहिले. गेल्यावर्षी या गोदावरीतून जायकवाडीच्या दिशेने 125 टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला होता. यंदा काल पर्यंत तो अवघा 5.8 टीएमसी इतका झाला. सप्टेंबरातील पावसावरच आता भिस्त आहे. नाशिक च्या धरणात 79.22 टक्के पाणी साठा आहे. गेल्या वर्षी कालच्या तारखेला तो 95.65 टक्के इतका होता. यंदा राहिलेल्या पावसाळ्यात भरपूर पाऊस पडावा अशी शेतकरी वर्गाची अपेक्षा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या