Tuesday, May 6, 2025
Homeधुळेआर्वीसह पिंपळनेर, बेहेड, दोंडाईचात धाडसी घरफोडी

आर्वीसह पिंपळनेर, बेहेड, दोंडाईचात धाडसी घरफोडी

धुळे – प्रतिनिधी dhule

जिल्ह्याभरात चोरट्यांनी कहर केला असून कडाक्याच्या थंडीतही चोरटे जोमात दिसून येत आहे. दररोज चोरी (theft), घरफोडीच्या घटना घडत आहेत. चोरट्यांनी आर्वी, पिंपळनेर, बेहेड, दोंडाईचातून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला.

- Advertisement -

आर्वी येथील कॉलनीत भरदिवसा चोरट्यांनी धुळे तालुक्यातील आर्वी येथील सिध्दीविनायक कॉलनीतील अंगणवाडी शिक्षिका अर्चना प्रमोद वाडीले यांच्याकडे चोरट्यांनी दि.3 रोजी घरफोडी केली. वाडीले कुटुंब हे सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी गेले होते. त्यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून घरातील कपाटाचे कुलूप तोडून 35 हजार रोख, सोन्याचे कानातले, ब्रेसलेट, चांदीची चैन, पाटल्या, पॅडल असा लाखोंचा ऐवज लंपास केला. तसेच गावातील योगेश्‍वर कॉलनीतील वासुदेव महाराज यांच्याकडेही चोरट्यांनी हातसफाई केली. 17 हजार रोख व दागिने लंपास केले. याप्रकरणी अर्चना वाडीले यांच्या तक्रारीवरून तालुका पोलिसात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

पावणे दोन लाखांची रोकड लंपास

साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातील हरिओम नगरात राहणारे दिलीप आनंदा महाजन (वय 25) यांच्याकडे दि.1 जानेवारी रोजी चोरी झाली. अज्ञात चोरट्याने घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातून 1 लाख 77 हजारांची रोकड लंपास केली. पिंपळनेर पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद झाला असून तपास पीएसआय मालचे करीत आहेत.

पोल तोडून तारेसह विजेचे साहित्य चोरीस

शिंदखेडा तालुक्यातील विखरण शिवारातील शेट गट क्र. 161 मधून चोरट्यांनी विज कंपनीची सिमेंटचे पोल तोडूनश त्यावरील लघुदाब वाहिनीचे अ‍ॅल्युमिनीयमची 1800 मिटर तार, लोखंडी बॅकेट, लोखंडी चॅनल व इतर इलेक्ट्रीक सर्कीटच्या वस्तु लंपास केल्या. त्यांची किंमत 45 हजार रूपये आहे. तसेच कापसाचीही चोरी झाली आहे. याबाबत महावितरचे सहाय्यक अभियंता मच्छिंद्र रंजन पाडवी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंद झाला आहे. पोहेकाँ शेख तपास करीत आहेत.

बेहेडला 24 हजारांची घरफोडी

साक्री तालुक्यातील बेहेड येथील प्रकाश श्रीराम तोरवणे (वय 57 ह.मु धनदाई कॉलनी, खुटवड नगर, कामटवाडा, नाशिक) या शेतकर्‍याचे गावातील घर चोरट्यांनी फोडले. रोकडसह 25 हजार 400 रूपयांचे दागिने चोरून नेले. दि. 2 जानेवारी रोजी ही घटना लक्षात आली. चोरट्यांवर साक्री पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पीएसआय निकम तपास करीत आहेत.

तरवाडेतून बॅटर्‍या लंपास

तालुक्यातील तरवाडे शिवारातून चोरट्यांनी टॉवरच्या 24 बॅटर्‍या लंपास केल्या. त्यांची किंमत 4 हजार 800 रूपये इतकी आहे. दि.10 डिसेंबर रोजी पहाटे साडेतीन ते चार वाजेदरम्यान ही चोरीची घटना घडली. याबाबत सुनिल खंडुजी खेमनार (वय 39 रा. स्वामी नारायण कॉलनी, दाता सरकार भवनजवळ, पारोळा रोड,धुळे) याने तालुका पोलिसात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोना शिरसाठ करीत आहेत.

बोलण्यात गुंतवून शेतकर्‍याचे 30 हजार लांबविले बोलण्यात गुंतवून दोन भामट्यांनी शेतकर्‍याकडील 30 हजारांची रोकड लंपास केली. शिंदखेडा- होळ रस्त्यावर टेंभलाय शिवारात ही घटना घडली. शेतकरी साहेबराव शंभु पाटील (वय 70 रा. नरडाणा ता. शिंदखेडा) हे काल दि. 3 रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जात होते. तेव्हा दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांना थांबविले. बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील 30 हजारांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून तपास पोना मराठे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नगर जिल्ह्यात पहिल्यांदा मंत्रिमंडळाची बैठक

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चोंडी येथे आज (दि. 6) होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीला दुपारी साडेबारा वाजता सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री...