Friday, May 24, 2024
Homeजळगावदरेगावात बिबट्याच्या बछड्याचे दर्शन

दरेगावात बिबट्याच्या बछड्याचे दर्शन

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

तालुक्यात गिरणा (Girna river) पट्ट्यात बिबट्याचा संचार कायम असून दोन दिवसापूर्वी सेवानगर येथे बिबट्याने गायीचे वासरू फस्त केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर आज तालुक्यातील दरेगाव शिवारातील ऊसाच्या शेतात बिबट्याचे दोन ते तीन बछडे ग्रामस्थांनी पाहिल्याची चर्चा आहे. यामुळे शेतकरी भयभीत झाले असून त्यांनी शेतात जाने थांबवले आहे. वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी (Forest Department) घटनास्थळी पाहणी केली असता, त्यांना बिबट्याच्या बछड्याचे पदमार्ग आढळुन आले नाही. तरी देखील ते शेतात बछडे आहे का? यांचा शोध घेत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

- Advertisement -

तालुक्यातील सेवानगर येथील शेतकरी ज्ञानेश्वर भिकन राठोड यांचे सेवानगर शेवारात शेत असून शेतात पत्री शेडमध्ये गुरे बांधलेली असतात सोमवारी सायंकाळी राठोड हे गुरांना चारापाणी करून घरी गेले. मंगळवारी पहाटे नेहमीप्रमाणे ते शेतात गेले असता गायीच्य वासरूचा हिंस्त्र प्राण्याने फडशा पाडल्याचे दिसून आले. त्यांनी ही माहिती वन विभागाला दिली. वासराचा पाडलेला पडशा पाहता हा हल्ला बिबट्याने केल्याचे दिसून येते. हल्ल्याच्या ठिकाणी पदमार्क दिसून आले ते नर बिबट्याचे असल्याची माहीती समोर आली आहे. तर आज तालुक्यातील दरेगाव शिवारात ऊसाच्या शेतात बिबट्याचे तीन बछडे खेळत असताना काही ग्रामस्थांना दिसले, माणसांंची चाहुल लागतच हे बछडेे ऊसाच्या शेतात गेल्याची माहिती सांगण्यात येत आहे. ही वार्ता गावात पोहचताच शेतकर्‍यांनी शेतात जाणे थांबवले असून त्यांच्यामध्ये घबराट निर्माण झाली आहे. वनविभागाचे कर्मचारी बछड्यांचा शोद घेत आहेत. परंतू त्यांन घटनास्थळावरुन कुठल्याही प्रकारे पदमार्ग व चिन्ह आढळुन आले नाहीत. त्यामुळे ते बिबट्यांचे बछडे होते की, अन्य प्राण्यांचे याबाबत साशंक्ता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यात बिबट्यांचा संचार असून विशेष म्हणजे नरभक्षक बिबट्याने सात लोकांचा जीव घेतला आहे. त्यामुळे आजही बिबट्या दिसला की शेतकरी व ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडते.

- Advertisment -

ताज्या बातम्या