Friday, May 31, 2024
Homeनाशिकरामकथेत नवविधा भक्तीचे दर्शन - आचार्य श्रेयस बडवे

रामकथेत नवविधा भक्तीचे दर्शन – आचार्य श्रेयस बडवे

नाशिक । वार्ताहर Nashik

भक्तीचे तत्त्वज्ञान नवविधा भक्तीमध्ये संपूर्णपणे सामावलेले आहे. तीच नवविधा भक्ती रामकथेमध्ये जागोजागी पाहायला मिळते. नवविधा भक्तीचा आविष्कार रामकथेच्या प्रसंगांतून आपल्याला पाहायला मिळतो. त्याची अनुभूती जगण्यात उतरण्याचा मंत्र रामकथा देते; असे प्रतिपादन आचार्य श्रेयस बडवे यांनी केले.बळवंत स. देशपांडे, लक्ष्मण स. देशपांडे आणि उर्मिलाताई देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अ‍ॅड. एस. एल. देशपांडे आयोजित रामकथा ज्ञानयज्ञाचे सहावे पुष्प गुंफताना ते बोलत होते.

- Advertisement -

आचार्य बडवे पुढे बोलताना म्हणाले, भक्ती जीवनाला पैलतीराला नेते. हीच भक्ती हनुमंताच्या ठिकाणी, भरताच्या ठिकाणी, लक्ष्मणाच्या ठिकाणी, शबरीच्या ठिकाणी रामकथेत पाहायला मिळते. ही सर्व पात्र म्हणजे रामकथेतील सर्वोच्च भक्तीचा उत्कट आविष्कार ठरली आहेत, असेही ते म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

आयुष्य बदलता येते. सर्वकाही नियतीवर ढकलून गप्प बसणे हे ईश्वराला कधीही मान्य नव्हते आणि नाही. जो सतत कार्यरत असतो, भक्ती करतो त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडते; याची अनेक उदाहरणे रामायणात आहेत. त्यामुळे संकटांनी घाबरून न जाता, संकटात तरुन जाण्यासाठी काय केले पाहिजे हे कळावे यासाठी रामकथेचे श्रवण करावे असेही बडवे यांनी सांगितले. यावेळी आचार्यांना मानसी बडवे, स्वप्निल परांजपे (हार्मोनियम), भालचंद्र बाळ (तबला) यांनी साथसंगत केली. शहरातील रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या