Monday, July 22, 2024
Homeनगरदर्शना पवार हिचा खूनच

दर्शना पवार हिचा खूनच

पुणे |प्रतिनिधी| Pune

- Advertisement -

पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी रविवारी सकाळी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिचा मृतदेह सापडला. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याची ओळख पटवणे अवघड जात होते. या प्रकरणात पोलिसांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली होती. पोलिसांची ही शक्यता खरी असल्याचे पोस्टमॉर्टम अहवालातून बाहेर आले आहे. आता या प्रकरणात संशयाची सर्व सुई तिचा मित्र राहुल दत्तात्रय हांडोरे याच्याकडे जात आहे. त्याच्यासंदर्भात बरीच माहिती पोलिसांनी जमा केली आहे.

कोपरगाव येथील दर्शना पवार हिचा मित्र राहुल हांडोरे याचा शोध पुणे पोलीस घेत आहेत. घटनेनंतर त्याचे शेवटचं लोकेशन पुण्यातील कात्रज होते. त्यानंतर दोन दिवसांनी तो बेपत्ता झाला. पुणे शहरातून तो सरळ नवी दिल्लीला गेल्याचे स्पष्ट होत आहे. कारण त्यानंतर दोन दिवसांनी नवी दिल्लीतील एटीएम सेंटरवरुन त्याने पैसे काढले. तसेच त्याच्या मोबाईलवरुन रविवारी रात्री त्याने नातेवाईकांशी संवाद साधला होता. यावेळी त्याने सांगितले की, एका मित्राशी वाद झाल्यानं पुणे सोडले आहे. इतके बोलून त्याने फोन कट केला होता. आता त्याचा फोनचे लोकेशन कोलकाता दिसत आहे.

कोपरगावच्या दर्शनाच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांची पाच पथके

हा पुरावा सर्वात महत्वाचा

दर्शना आणि राहुल दोघेही 12 जूनला साधारण 8 वाजून 15 मिनिटांनी गडाच्या पायथ्याशी पोहचले. त्यानंतर दोघांनीही गड चढायला सुरुवात केली. हे सर्व CCTV फुटेजमध्ये दिसले. फुटेजमध्ये दोघेही राजगडावर जाताना दिसत आहेत. मात्र त्यानंतर 10 वाजताच्या सुमारास राहुल एकटाच परत आला. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज या प्रकरणात महत्वाचा पुरावा ठरणार आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही दर्शना पवार हिचा मृत्यू सामान्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमा आढळल्या आहेत. यामुळे तिचा खून झाला असल्याचा संशय आहे. या खून प्रकरणात दर्शनाच्या मित्रावर संशयाची सूई जात आहे. राहुल पोलिसांच्या हाती सापडल्यानंतरच या प्रकणावर प्रकाश पडणार आहे.

पुण्यातून बेपत्ता असलेल्या कोपरगावच्या तरुणीचा गुढ मृत्यू

- Advertisment -

ताज्या बातम्या