Saturday, November 23, 2024
Homeनगरदसर्‍याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी झुंबड

दसर्‍याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी झुंबड

दुचाकी, चारचाकी, इलेक्ट्रिानिक वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची रेलचेल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

विजयदशमीनिमित्त अहिल्यानगर शहराच्या बाजारात फुलांना मागणी होती. फुलांची आवक कमी असल्याने सुरूवातीला झेंडू 60 ते 70 व शेवंतीचे 150 रुपयांचे भाव स्थिर होते. दुसरीकडे बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. दुचाकी, चारचाकी, इलेक्ट्रिानिक वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची रेलचेल होती.

- Advertisement -

विजयदशमी मंगल्या, चैतन्य, आनंदचा सण असून साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यानिमित्त गरिबातील गरीब माणूस काहींना काही खरेदी करतो. त्यामुळे शनिवारी बाजारात खरेदी उत्सव दिसून आला. दुचाकी, चारचाकी वाहनांची गेल्या काही दिवसांपासून बुकिंग सुरू होते. त्यानंतर काल मुहूर्तावरग्राहकांनी दुकानात येऊन खरेदीसाठी गर्दी केली होती. सराफ बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. विजयदशमी निमित्त घराघरी वाहन, शस्त्र पूजा केली जाते. त्यासाठी फुलांना अनन्य साधारण महत्त्व असते.

व्यावसायिकही दुकानात पूजा करतात. त्यामुळे कालपासून झेंडू, शेवंती, अष्टर अशा फुलांना चांगलीच मागणी होती. शनिवारी दुपारी बाजारात फुलांची आवक घडली. त्यामुळे फुलांचे भाव स्थिर राहिले होते. किरकोळ विक्रीसाठी झेंडूला मार्केटमध्ये 60 ते 70, अष्टर 150, शेवंती 150, गुलछडली 150 होता. किरकोळ विक्रीसाठी झेंडूला शंभर रुपये दर होता. तर, शेवंतीला 200 रुपये दर होता. त्यामुळे ऐन सणासुदित फुलांनी चांगलाच भाव खल्ला होता. दरम्यान, व्यावसायिकांनी दुकानांना कृत्रित फुलांच्या माळा व विद्युत रोषणाई करून सजावट केली होती. तर, दुचाकी, चारचाकी शोरूममध्ये वाहन बुकिंगसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या