Saturday, October 12, 2024
Homeमुख्य बातम्याDasara Melava : मोठी बातमी! ठाकरेंचा 'शिवाजी पार्क'वर तर शिंदेंच्या शिवसेनेचा 'या'...

Dasara Melava : मोठी बातमी! ठाकरेंचा ‘शिवाजी पार्क’वर तर शिंदेंच्या शिवसेनेचा ‘या’ ठिकाणी होणार दसरा मेळावा

मुंबई | Mumbai

मागील वर्षी शिवसेनेत (Shivsena) पडलेल्या फुटीनंतर दोन्ही गटात दसरा मेळाव्यावरुन (Dasara Melava) चांगलाच वाद उफाळला होता. त्यानंतर यंदा देखील दोन्ही गटांत शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा घेण्यावरून वाद निर्माण झाला होता. शिंदेंच्या शिवसेनेने अर्ज मागे घेतल्यामुळे ठाकरे गटाचा (Thackeray Group) शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, शिंदेंची शिवसेना दसरा मेळावा कुठे घेणार असा तिढा निर्माण झाला होता. पंरतु, आता हा तिढा सुटला असून शिंदेंच्या शिवसेनेचे दसरा मेळावा घेण्याचे ठिकाण निश्चित झाले आहे…

- Advertisement -

Rohit Pawar : अजित पवारांवर बोरवणकरांनी केलेल्या आरोपांवर रोहित पवारांचे सूचक विधान; म्हणाले, सरकारला…

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर (Aazhad Maidan) होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून आधी दसरा मेळावासाठी क्रॉस मैदान व आझाद मैदान ही दोन मैदाने ठरवण्यात आली होती. मात्र, आता शिंदेंच्या शिवसेनेकडून आझाद मैदानावर दसरा मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्रॉस मैदान क्रिकेटचे मैदान असल्याने मैदानांवर नियोजन करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे आता आझाद मैदानावर शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा घेतला जाणार आहे.

Gopichand Padalkar : “महाराष्ट्रात जाती-जातीत भांडण लावणारा लांडगा कोण हे सगळ्या…”; गोपीचंद पडळकरांची पुन्हा पवार कुटुंबावर टीका

दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदा देखील ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार असल्याने ठाकरेंचाच आवाज शिवाजी पार्कमध्ये घुमणार आहे. मागील वर्षी देखील मैदानावरुन वाद निर्माण झाला होता. पण त्यावेळी देखील ठाकरेंनाच दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचे मैदान मिळाले होते. तर शिंदेंच्या शिवसेनेने बीकेसीच्या मैदानावर (BKC Maidan) दसरा मेळावा घेतला होता. पंरतु, यंदा बीकेसीच्या मैदानावर अनेक कामं सुरु असल्याने शिंदेंच्या शिवसेनेला दसरा मेळावा त्याठिकाणी घेणे शक्य नव्हते. मात्र, आता दोन्ही गटांना दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळाल्याने दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जाण्याची शक्यता आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Ajit Pawar : भाजप पाठिंब्यावर अजित पवार मुख्यमंत्री?

- Advertisment -

ताज्या बातम्या