Monday, May 20, 2024
Homeमुख्य बातम्यामराठा समाजाला आरक्षण देणारच; शिवरायांची शपथ घेऊन एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही

मराठा समाजाला आरक्षण देणारच; शिवरायांची शपथ घेऊन एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही

मुंबई | Mumbai

बाळासाहेबांची शिवसेनेचा दसऱ्या मेळावा मुंबईतील आझाद मैदानावर हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ठाकरेंचं हिंदुत्त्व हे दुबळेपणाचे आहे. सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी लाचारी स्वीकारली. ज्यांनी कारसेवकांवर गोळीबार केला? बाळासाहेबांनी ज्यांना ज्यांना दूर केले त्यांना उद्धव ठाकरेंनी जवळ केले. त्यामुळे गद्दार कोण आणि महागद्दार कोण जनता हुशार आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या हिंदुत्त्वाचा गोळा घोटला तर चालेल का? गर्व से कहो हम काँग्रेस के साथ है, आज हेच चालू आहे, असे ते म्हणाले.

“आमचं सरकार आलं तर तुम्हालाही उलटं टांगू”; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा बाण

ते पुढे म्हणाले की, खरं म्हणजे बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी मतदानाचा अधिकार गमावला. इतर आमदार आणि खासदारांनी त्यांची लोकप्रतिनिधीत्व गमावले. मात्र बाळासाहेबांनी कधीही आपल्या हिंदुत्वाचे विचार सोडले नाही. पण रक्तचे नातं सांगणाऱ्यांनीच बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घोटला आहे. त्यांची बांधिलकी फक्त पैशांशी आहे.

उद्धव ठाकरेंना २००४ सालापासूनच मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. पण जुगाड काही लागत नव्हता. उद्धव ठाकरे म्हणायचे की, मी बाळासाहेबांना शब्द दिलाय की, शिवसैनिकांना पालखीत बसवणार, त्यांना मुख्यमंत्री बनवणार, पण कोणाला? आम्ही विचार करत होतो. परंतु या महाशयांनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर लगेचच टूनकण उडी मारली आणि तिकडे खुर्चीवर जाऊन बसले.

त्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले मला कुठे व्हायचं मुख्यमंत्री. परंतु मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी पवार साहेबांकडे दोन माणसे पाठवली. विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागताच ते सर्व दारे उघडी असल्याचे म्हणत होते. परंतु त्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते.

सगळ्यांना त्यांचा एक चेहरा दिसतोय. परंतु त्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे आहेत. त्यामुळे भोळेपणाने जे तिकडे आहेत त्यांनी सावध व्हावे. त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका, पोटातले पाणी पण हलू दिले नाही. सितेचं हरण करण्यासाठी रावणाने साधूचे रूप घेतले होते. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदासाठी संधीसाधू बनले, असा टोला शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.

ते पुढे म्हणाले की, मी मराठा समाजाचा आहे, आयुष्यभर समाजासाठी राबलोय, मी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणार असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Thackeray Group Dasara Melava : “महाराष्ट्र विकणाऱ्या गद्दारांना गाडून टाकू”; मुस्लिम शिवसैनिकाच्या बॅनरने वेधले लक्ष

- Advertisment -

ताज्या बातम्या