Saturday, May 25, 2024
Homeनगरदशाबाई डोंगरावरील ऐतिहासीक वास्तूंचे विद्रुपीकरण

दशाबाई डोंगरावरील ऐतिहासीक वास्तूंचे विद्रुपीकरण

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर तालुक्यातील कान्हुर पठार रोड लगत आसलेल्या दशाबाई डोंगरावरील ऐतिहासिक वास्तू तसेच इतिहासाच्या खानाखूना मिटवण्याचा प्रयत्न होत असून त्यांचे जतन व्हावे व विद्रुपिकरण करणारांवर कारवाई करण्याची मागणी अहमदनगर येथील शिवदुर्ग संवर्धन प्रतिष्ठानच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे.

- Advertisement -

पारनेर शहराजवळील कान्हुर पठार रोड लगत सोबले वाडी, कुंभार वाडीजवळ ऐतिहासिक खाणाखुना असलेला दशाबाईचा डोंगर आहे . त्या डोंगरावर दशभुजा देवी अर्थात म्हैश्यासुर मर्दीनी देवीची पुरातन मुर्ती आहे. या दशाबाई देवस्थानचा ऐतिहासिक पुस्तकांमध्ये संदर्भ आढळुन येतात. पंरतु अलिकडच्या काळात तेथे काही वास्तुंचा आकार बदलुन, हिरव्या चादरी घालून वेगळेच देवस्थान उभे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच तेथील ऐतिहासिक खाणाखुना जानुनबुजुन मिटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आढळून येत आहे.

1 ऑक्टोबर 2023 रोजी शिवदुर्ग संवर्धन प्रतिष्ठानने दशाबाई डोंगरावर स्वच्छता मोहीम राबवली होती. त्यांनी पाहणी केली असता. डोंगरावर चुन्याचा घाणा होता तो समाजकंठकांनी बुजुन मिटवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तसेच चुन्याच्या घाण्याचे दगडी चाक फोडून टाकण्यात आले आहे. एक दगडी बांधीव पाणी हौदही बुजवला गेला आहे. या डोंगरावर एका बाजुला चांदबिबीची कबर आहे. असे असताना मध्यभागी एका चौथर्‍यावर एक समाधी असुन त्यावर हिरव्या शाली टाकून त्याचे उद्दातीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक पहाता हा चौथरा हिदु संस्कृती पद्धतीने बांधलेला दिसत आहे.

याबाबत इतिहास अभ्यासक सतिष सोनवणे यांनी सांगितले की, ब्रिटिश कालीन अहमदनगर गॅझेटियर मध्ये दशाबाई डोंगर असा उल्लेख आहे. मिडोज टेलरच्या पुस्तकात. चांद बिबी ची कबर किल्ल्यातील एका कोपर्‍यात असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे येथे मध्यभागी दुसरी कबर असणे शक्य नाही. दशाबाई डोंगरावरील देवीच्या मुर्तीची तंज्ञाकडून बारीक अभ्यास केला असता ती मुर्ती शालीग्राम शैलीची अशु शकते म्हणजे हे देवस्थान शेकडो वर्षापूर्वीचे आहे. यामुळे दशाबाई डोंगरावर ऐतिहासिक खानाखुना नष्ट करुन वेगळ्याच देवस्थानचे उदात्तीकरण केले जात आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच असे करणार्‍यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

याबाबत लवकरच भारतीय पुरातत्व विभाग, वन विभाग व अहमदनगर जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यव्हार करणार आसल्याचे शिवदुर्ग प्रतिष्ठान पदाधिकार्यानी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या