Friday, April 25, 2025
Homeक्राईमदत्तनगरला चार ठिकाणी घरफोडी

दत्तनगरला चार ठिकाणी घरफोडी

पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar

श्रीरामपूर- संगमनेर रोडवरील दत्तनगर परिसरातील हमरस्त्यालगत असलेल्या आगाशेनगर येथे एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी चार घरफोड्या केल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी महसूल विभागाचे माजी अधिकारी सतीश पाटोळे यांच्या बंद असलेल्या घराचा शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून घरातील रोख रक्कम 50 हजार रुपये व दीड तोळे सोन्याची चैन असा साधारण पावणेदोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
सतीश पाटोळे हे पुण्याला आपल्या मुलाकडे गुरुवारी कामानिमित्त गेले होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी हात साफ करत घरातील मुद्दमाल लंपास केला आहे.

- Advertisement -

सकाळी नियमितपणे घरकाम करणारी महिला पाटोळे यांच्या घरासमोर आल्यानंतर दार उघडे पाहून मोठ्याने आवाज दिला. मात्र, पाटोळे कुटुंब घरात नसल्याने सदर महिलेला कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने घरकाम करणार्‍या महिलेने काही अंतरावर राहत असलेले विपुल शेलार यांना कळवले. यावेळी शेलार यांनी पाटोळे कुटुंबियांना भ्रमणध्वनीद्वारे कळवले की, तुमच्या घराचा कडी-कोयंडा तोडलेला आहे. यावेळी पाटोळे यांनी आपल्या नातेवाईकाला भ्रमणध्वनीद्वारे सांगून निवासस्थानी जाण्यास सांगितले. दरम्यान विपुल शिलार यांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना कळविली. माहिती मिळताच पोलिस फौजफाट्यासह पाटोळे यांच्या निवासस्थानी दाखल झाले व घटनेचा पंचनाम केला. यावेळी पोलीस निरीक्षक देशमुख यांनी श्वानपथक व ठसेतज्ज्ञ यांना पाचारण करून तपासाचे चक्र फिरवले. पुण्याहून दुपारी दोन वाजता संपूर्ण पाटोळे कुटुंब आपल्या निवासस्थानी दाखल झाले. याप्रकरणी सतीश पाटोळे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला.

त्याच रात्री अज्ञात चोरट्यांनी आपला मार्चा परिसरातील श्री. पंडित, श्री.शेळके, श्री.अभंग यांच्या घराकडे वळवून त्या ठिकाणाहून दुचाकी वाहनांसह अन्य वस्तू लंपास केल्या. सदर चोरटे हे सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाले आहे.
मध्यरात्री या घरफोड्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून या भागात रात्रीच्या वेळी ग्रस्त वाढवावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. दत्तनगर परिसर मोठा विखुरलेला असून गेल्या सहा महिन्यापासून अनेक लहान मोठ्या घरफोड्याचे सत्र येथे सुरू आहे मात्र, पोलिसांकडून या घटनांचा तपास लागत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी परसली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक रात्रीचा काळ हा जागून काढत असल्याचे दिसून येत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...