पुणे | Pune
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात (Swargate Shivshahi Bus Rape Case) अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या (Dattatray Gade) पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी दोन दिवसांपासून उसात लपून बसला होता, पण त्याला जेवायला मिळत नसल्याने तो नातेवाईकांकडे गेला.
100 पोलीस, ड्रोन आणि श्वान पथकांच्या मदतीने दत्ता गाडेचा शोध घेण्यात आला. नातेवाईकांच्या घराच्या परीसरात असलेल्या बेबी कॅनॅालमध्ये झोपला होता. तिथेच पोलिसांनी त्याला अटक केली. महत्त्वाचे म्हणजे आरोपीला पकडण्यासाठी ग्रामस्थांनीही पोलिसांना मदत केली.सध्या त्याच्याकडून कसून चौकशी केली जात आहे. अशातच आता दत्तात्रय गाडे याच्याबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आरोपी दत्ता गाडे यानी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे. गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलिसांची माहिती दिली आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र, दोरी तुटली त्यामुळे तो वाचला अशी माहिती समोर आली आहे. आरोपीची प्राथिमक आरोग्य तपासणी झाली. त्याच्या गळ्यावर मार्क आहे. त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं.
दोरी तुटली आणि लोकांनी घटनास्थळी जाऊन त्याला वाचवल्याने त्याने आत्महत्या केली नसल्याचं बोललं जातंय, असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेवेळी सांगितलं आहे. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या या माहितीमुळे त्याने अटक होण्याआधी आत्महत्येचा प्रयत्न केला होता का? अशी चर्चा सुरु झाली आहे. तर त्याची आणि ज्या ठिकाणी अत्याचाराचा प्रयत्न झाला त्या ठिकाणी तपास केला जाणार असल्याची माहिती देखील आयुक्तांनी दिली आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेवेळी बोलताना सांगितलं, त्याचे पहिले मेडिकल चेकअप झालेले आहे. त्यामध्ये त्याच्या मानेवरती काही व्रण आढळून आले आहेत. त्यावरून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे सांगतात. तर दोरी तुटल्यामुळे आणि तिथे लोक तातडीने पोहोचल्यामुळे तो वाचला अशा प्रकारची माहिती लोक सांगत आहेत. या गोष्टीची पडताळणी करण्यासाठी तिथे पोलिसांना जावं लागेल. ते पडताळणी केल्यानंतर कळेल परंतु आता एका मेडिकलमध्ये त्याच्या गळ्यावरती व्रण दिसून येत आहेत, असं अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे.