Wednesday, June 26, 2024
Homeनाशिकप्रदूषण मुक्त नंदिनीसाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे

प्रदूषण मुक्त नंदिनीसाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे

नाशिक | प्रतिनिधी

- Advertisement -

शुध्द निर्मळ वाहणाऱ्या नदीच्या पाण्यात नागरी वसाहतीतील घाण मिसळण्यातून पाणी दूषित झाले आह. त्यामुळे नदीला गतवैभव पून्हा मिळवून देण्याची जबाबदारी देखिल आपलीच असल्याने प्रत्येकाने याबाबत जागरुकता बाळगली तर नदी स्वच्छ सुंदर करणे सहज शक्य असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. त्यासाठी विद्या प्रबोधिनी प्रशाला शाळेतील मुलांची संसद स्थापन करुन त्यात ५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून शाळांमधून मुलांमध्ये जनजागृती करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.

दैनिक देशदूतच्या माध्यमातून भोसला मिलीटरी स्कुलच्या विद्या प्रबोधिनी प्रशाळेच्या सभागृहात ‘सफर गोदावरीची ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बेळगाव ढगाचे माजी सरपंच दत्तू ढगे, नमामी गोदा फाऊंडेशनचे समन्वयक राजेश पंडीत,

नदी जल अभ्यासक व आर्किटेक्ट महाविद्यालयाच्या प्राचार्य प्राजक्ता बस्ते, रोशन केदारे, व्हिसल मॅन व सफर गोदावरीचे समन्वयक चंद्रकिशोर पाटील, संस्थेच्या चेअरमन आसावरी धर्माधिकारी, मुख्यध्यापक राजन चेट्टीयार, पर्यवेक्षक प्रियंका भट, समाजसेविका प्रा.टिना चौधरी,योगेश वर्मा, दै.देशदूतच्या संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले आदी मान्यवर होते.

Video : पावसामुळे शहरात वाहतूक कोंडी; रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

प्रत्यक्षात सह्याद्री पर्वत रांगेतील सूपाच्या डोंगरातून नंदिनी नदीचा उगम झालेला आहे. त्यानंतर तळेगाव, महिरावणी, अंजनेरी, वासाळी, तिरडशेत पिंपळगाव बहुला या गावांतून ही नदी वाहते. या परिसरातील नदीचे स्वरुप हे निर्मळ आहे. मात्र पुढे या नदीला मोठ्या प्रमाणात गटार, नाले व दुषित पाणी मिसळत असल्याने नदीचे पाणी अतिशय दुषीत झाले आहे. त्यावर काम करण्याची गरज असल्याचे बेळगाव ढगाचे माजी सरपंच दत्तू ढगे यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी नंदिनी नदीला मिसळणाऱ्या विविध उपनद्यांची माहीती दिली. तसेच भारतीय प्रजातीच्या झाडांचे महत्व विषद करुन त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या जैवविविधतेच्या संगोपनाची सविस्तर माहिती दिली.

Tripura Earthquake : मोरोक्कोनंतर त्रिपुरा भूकंपाने हादरलं!

यावेळी नमामी गोदा फाउंडेशनचे राजेश पंडीत यांनी नदीच्या प्रदूषणाला रोखण्यासाठी बालपणीच नदी स्वच्छतेचे बाळकडू देण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले. तसेच २ ऑक्टोंबर रोजी गोदावरी काठावर आयोजित पर्यावरण संवर्धन कार्यक्रमात गोळा केल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या माध्यमातून प्रशासनाला त्याबद्दलची जागरुकता अधोरेकित करण्याचा मनोदय व्यक्त केला. तसेच भोसलाच्या मुलांना रॅपर, वनटाईम युज प्लॅस्टिक, इतर प्लॅस्टिक बॅगजमा करुन गोदातीरी २ ऑक्टोंबरला आणण्याचे आवाहन केले.

यावेळी चंदू पाटील यांनी प्रत्येक मुलाने व्हिसल मॅन बनून नदीत कचरा टाकणार्‍यांना रोकण्यासाठी पूढे येण्याचे आवाहन केले. तसेच नदी संवर्धन उपक्रमाला चळवळ उभी करण्याची इच्छा व्यक्त केली.

MLA Disqualification Case : शिवसेनेचे ५४ आमदार येणार एकाच छताखाली; अपात्रतेसंदर्भात लवकरच निर्णय

प्रास्ताविकात डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी सफर गोदावरीच्या वाटचालीचा आढावा सादर केला.सफर गोदावरीच्या माध्यमातून राबविलेल्या विविध उपक्रमांची माहीती मुलांना सांगितली.तसेच मंचावरील मान्यवराच्या कार्यांचा परिचयही करुन दिला.

भोसला विद्या प्रबोधिनी प्रशाला स्कुलमधे पर्यावरण संसद

यावेळी उपस्थित ८वीच्या मुलांना मनोगत व्यक्त करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यात मृण्मयी चिंतामणी, वैभवी पाटील, दानिश खान, प्रणव मेटकर, आदित्य मेहेर, पृथ्विराज खैरे यांनी प्रदुषणाबद्दल मनोगत व्यक्त केले. यावेळी सफर गोदावरीच्या सदस्यांद्वारे विद्याप्रबोधिनी स्कुलमध्ये गोदावरी संवर्दनासाठी पर्यावरण बचाव संसदेची स्थापना करण्यात आली. या सहाही जणांना त्या संसदेचे खासदार म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांच्या माध्यमातून शाळेच्या इतर मुलांशी संवाद साधून २५ जणांची टिम तयार करण्याचे निश्चित करण्यात आले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या