Thursday, June 11, 2026
Homeक्राईमCrime News : वडिलांकडून मुलीची हत्या; बहिणीवरही जीवघेणा हल्ला

Crime News : वडिलांकडून मुलीची हत्या; बहिणीवरही जीवघेणा हल्ला

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgaon

कौटुंबिक वादातून वडिलांनीच मुलीची कुर्‍हाडीने हत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच एरंडगाव समसूत्र (ता.शेवगाव) येथे घडली आहे. मिर्चाना काळे (वय-54) यांचा मृत्यू झाला तर तर भारती वैष्णव (वय-45) या बहिणीवर ही हल्ला करण्यात आल्याने ती ही जखमी झाली आहे.

- Advertisement -

या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी जयराम भोसले यास ताब्यात घेतले आहे. भारती वैष्णव (वय 43, रा. गांधीचमन ता.जालना) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, भारती या बहिणीकडे एरंडगाव समसूत्र येथे आल्या होत्या. यावेळी आरोपी वडील भोसले याच्यासोबत उसतोडीसाठी दिलेल्या पैशांवरून वाद झाला.

वाद वाढताच संतापलेल्या आरोपीने घरातून कुर्‍हाड आणून जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत मुलगी अर्चना हिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या भारती वैष्णव यांच्यावरही आरोपीने कुर्‍हाडीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राहुरीसह अन्य कृषी विद्यापीठांतील पद भरतीचा मार्ग मोकळा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी मिळाली आहे. तब्बल 23 वर्षांनंतर विद्यापीठांच्या अ आणि ब संवर्गातील एकूण 3,723 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता...