Monday, November 25, 2024
Homeक्रीडाWorld Cup दरम्यान इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजानं घेतला निवृत्तीचा निर्णय

World Cup दरम्यान इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजानं घेतला निवृत्तीचा निर्णय

मुंबई | Mumbai

सध्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा थरार सुरू आहे. स्पर्धेने अर्धा टप्पा पार केला आहे. स्पर्धेत आतापर्यंत 31 सामने पार पडले आहेत. अशातच धक्कादायक बातमी समोर येत आहे. इंग्लंड संघाचा 33 वर्षीय खेळाडू डेविड विली याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तो विश्वचषक 2023 स्पर्धेनंतर निवृत्त होणार आहे.

- Advertisement -

विलीने सोशल मीडियावर एक भलीमोठी पोस्ट करत निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त असल्याचे सांगताना विलीने पोस्टच्या माध्यमातून म्हटले की, हा दिवस यावा असे मला कधीच वाटत नव्हते. माझी पहिल्यापासूनच इंग्लंडसाठी क्रिकेट खेळायची इच्छा होती. इथपर्यंतचा प्रवास खूप चांगला आणि संस्मरणीय राहिला. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याची हीच चांगली वेळ असल्याचे मला वाटते. मी एवढ्या चांगल्या संघाचा भाग राहिलो याचा अभिमान आहे. इंग्लिश संघासोबत माझ्या खूप आठवणी आहेत, ज्यांनी मला कठीण काळात साथ दिली. माझे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तडजोड करणाऱ्या सर्वांचे आभार… माझी पत्नी, मुले, आई आणि वडिलांचा मी ऋणी आहे. सर्वांचे आभार…!!

दरम्यान, चालू विश्वचषक म्हणजे इंग्लिश संघासाठी एक वाईट स्वप्नच. ट्वेंटी-२० आणि वन डे विश्वचषकाचे मानकरी असलेल्या इंग्लंडने यंदाच्या पर्वात निराशाजनक कामगिरी केली. जोस बटलरच्या नेतृत्वातील संघाला सहापैकी केवळ १ सामना जिंकता आला आहे. अफगाणिस्तानने देखील गतविजेत्यांना पराभवाची धूळ चारून उलटफेर केला. केवळ दोन गुणांसह इंग्लंडचा संघ आताच्या घडीला विश्वचषकाच्या गुणतालिकेत तळाशी आहे. गतविजेत्यांना शेवटच्या सामन्यात भारताकडून दारूण पराभवाचा सामना करावा लागला. यजमान संघाने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव करून विजयी षटकार लगावला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ९ बाद २२९ धावा केल्या होत्या. सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लिश संघ ३४.५ षटकांत १२९ धावांवर सर्वबाद झाला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या