Monday, April 6, 2026
HomeनगरCrime News : भरदिवसा घरफोडी करून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास

Crime News : भरदिवसा घरफोडी करून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास

राहुरी (प्रतिनिधी)

दुपारच्या वेळी घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन एका भामट्याने घराची कडी उघडुन आत प्रवेश केला. आणि घरातील सोन्याच्या दागीन्यांसह रोख रक्कम चोरुन नेली. ही घटना राहुरी तालुक्यातील निंभेरे येथे घडली आहे.

- Advertisement -

मयुरी योगेश सोनवणे, रा. निंभेरे, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, मयुरी सोनवणे यांचे घरा जवळच ब्युटीपार्लरचे दुकान असुन तेथेच त्यांची सासु कपडे शिवण्याचे काम करतात. दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी मयुरी सोनवणे व त्यांची सासू घराला कडी लावून दुकानात गेल्या होत्या. मयुरी सोनवणे ह्या ५.३० वाजे दरम्यान घरी गेल्या असता त्यांच्या घराचे बाहेरील पडवीत विकास खेत्रे हा खाटावर बसलेला होता. तेव्हा मयुरी सोनवणे ह्या त्याला म्हणाल्या कि, तु येथे काय करतो, तेव्हा त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. नंतर मयुरी सोनवणे यांनी त्यांच्या सासूला बोलावुन आणले आणि विकास खेत्रे याच्या घरी जावुन त्याचे आई व भाऊ यांना झालेला प्रकार सांगितला.

तेव्हा ते म्हणाले तुम्ही आमचे मुलावर आरोप का लावता, असे म्हणुन शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मयुरी सोनवणे यांनी घरात जावुन पाहिले असता घरातील साहित्याची उचकापाचक झालेली होती. तसेच मणिमंगळसुत्र, नाकातील नथ असे साडेसहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व ३५ हजार रुपये रोख रक्कम चोरुन नेल्याचे दिसून आले. तेव्हा मयुरी सोनवणे यांची खात्री झाली की, विकास खेत्रे याने घराची कडी उघडुन घरात प्रवेश केला आणि मुद्देमाल चोरुन नेला. मयुरी योगेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी विकास आनंदा खेत्रे, मंगल आनंदा खेत्रे, आकाश आनंदा खेत्रे, सर्व रा. निंभेरे, ता. राही. यांच्यावर गु.र.नं. १३८१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३५१ (२), ३५२, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : अजय बागूलसह तिघांना हायकोर्टाकडून जामीन

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शहरात खळबळ उडवून देणाऱ्या विसे मळा गोळीबार आणि अपहरण प्रकरणातील (Firing Case) संशयितांना अखेर दिलासा मिळाला आहे. भाजप नेते सुनील...