Saturday, October 5, 2024
Homeब्रेकिंग न्यूजLadki Bahin Yojana : 'लाडक्या बहि‍णीं'ची दिवाळी होणार दणक्यात साजरी; 'या' तारखेपर्यंत...

Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहि‍णीं’ची दिवाळी होणार दणक्यात साजरी; ‘या’ तारखेपर्यंत मिळणार दोन महिन्यांचे एकत्रच पैसे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) प्रचंड प्रतिसाद मिळत असून महिलांच्या खात्यात तिसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक आदिवासी भागातील महिलांनाही (Women) या पैशांच्या माध्यमातून अनेक गोष्टींमध्ये फायदा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना महिन्याला १५०० रुपये देण्यात येत आहेत. तसेच सदर योजनेसाठी राज्यातील कोट्यवधी महिला पात्र ठरल्या असून या योजनेचा लाभ मिळालेल्या महिलांना जुलै पासून महिन्याला १५०० रुपये देण्यास सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल कधी वाजणार? समोर आली ‘ही’ तारीख

राज्य सरकारने (State Government) सर्वात आधी दोन महिन्यांचे एकत्र म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे मिळून महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा केले होते. त्यानंतर पुन्हा सप्टेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहेत. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी लाडक्या बहि‍णींना अजून एक मोठी खुशखबर दिली आहे. लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन महिन्यांचे पैसे खात्यावर जमा होणार असून नोव्हेंबर महिन्यांचे पैसे देखील ऑक्टोबरमध्येच म्हणजे दिवाळीलाच (Diwali) जमा होणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

हे देखील वाचा : Raj Thackeray : महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारले; म्हणाले, “कितीही बेताल…”

यावेळी अजित पवार म्हणाले की,”मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आधी दोन महिन्यांचे तीन हजार दिले. त्यानंतर आता लाडक्या बहि‍णींना सप्टेंबर महिन्याचे (September Month) पैसे दिले आहेत. मात्र, आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे लाडकी बहीण योजनेचे पैसे १० ऑक्टोबरच्या (October) आधी दिवाळी भाऊबीजेची ओवाळणी बहि‍णींच्या खात्यावर जमा होणार आहे, हा शब्द मी तुम्हाला देतो”, असे त्यांनी एका सभेत बोलताना म्हटले.

हे देखील वाचा : शरद पवारांचा छगन भुजबळांविरुद्ध उमेदवार ठरला? ‘या’ नेत्याने घेतली जयंत पाटलांची भेट

दरम्यान, सरकारच्या नवीन नियमांनुसार o१ सप्टेंबरपासून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना सप्टेंबर महिन्यातच लाभ मिळेल. तसेच ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज (Application) केला आहे, त्यांना जुलै आणि ऑगस्ट दोन महिन्याचे ३ हजार रुपये मिळणार नाहीत. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना फक्त १५०० रुपये दिले जाणार आहेत. तर ०१ सप्टेंबरच्या आधी अर्ज करूनही अनेक महिलांच्या खात्यात पैसै जमा झालेले नाहीत. अर्ज मंजूर झाल्यानंतरही या महिलांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. आधार नंबर बँक खात्याशी लिंक न झाल्याने किंवा अर्जात अन्य त्रुटी असल्याने महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. मात्र,ज्या महिला यासाठी पात्र ठरल्या आहेत, त्यांना योजनेचे पैसे मिळणार आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या