नागपूर | Nagpur
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविरोधात केंद्रीय पातळीवरून विरोधकांनी (Opposition Parties) मोट बांधायला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, नितिश कुमार यांनी विरोधकांच्या ऐक्यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक देखील होणार असून काही दिवसांपूर्वी नितीश कुमार यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली होती. याच विरोधकांच्या रणनीतीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टीकास्त्र सोडले आहे.
Ashish Deshmukh : फडणवीस-बावनकुळेंच्या उपस्थितीत आशिष देशमुख यांचा भाजपात प्रवेश
“देशात मोदींच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. ते पटण्याला रॅली करणार आहेत. फ्लॅशबॅकमध्ये तुम्ही गेलात तर अशीच रॅली २०१९ मध्येही झाली होती. हातात हात घालून फोटो काढले होते. मंचावर जेवढे नेते होते तेवढ्याही जागा लोकसभेमध्ये काँग्रेसच्या निवडून आल्या नाहीत.
मंचावर ५५ लोक होते आणि काँग्रेसच्या ४८ जागा निवडून आल्या होत्या. त्यामुळे मी तर यांना आव्हान करतो, तुम्ही एकत्रित येत आहात, एकत्रित लढणार आहात. तुम्हाला मतदान देण्याआधी केवळ एवढंच सांगा की तुमचा एक नेता कोण आहे? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला.
आमदार मनिषा कायंदे शिंदे गटाच्या वाटेवर; संजय राऊत म्हणतात, “स्वार्थी लोक ओळखण्यात…”
पुढे ते म्हणाले की, ‘तुम्ही तुमचा नेते कोण आहे हे सांगा. जंगलातले कितीही प्राणी आले, तरी वाघाची शिकार करू शकत नाही. आज कितीही विरोधक एकत्र आले तरी मोदींना हरवू शकत नाही, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच मागच्या लोकसभेत २०३ जागा मिळाल्या होत्या. यावेळी जास्त जागा घेऊन मोदी निवडून येतील असा ठाम विश्वासही फडणवीसांनी बोलून दाखवला.