Sunday, May 26, 2024
Homeमुख्य बातम्याएकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा कालावधी पूर्ण करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा कालावधी पूर्ण करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील. त्यांच्या कार्यकाळातील एकही दिवस कमी होणार नाही. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांच्याच नेतृत्वाखाली आगामी निवडणूक लढवली जाईल, असा खुलासा भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे….

- Advertisement -

CM Eknath Shinde : फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’ व्हिडीओवर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

प्रदेश भाजपच्या (BJP) वतीने काल (शुक्रवार) रोजी देवेंद्र फडणवीस यांची मी पुन्हा येईन ही ध्वनीचित्रफित प्रसारित करण्यात आली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या जागी फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र प्रदेश भाजपने ही ध्वनीचित्रफित लगेच मागे घेतली. या पार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना फडणवीस यांनी ध्वनीचित्रफितीच्या संदर्भात स्पष्टीकरण देताना वरील स्पष्टीकरण दिले. त्याचवेळी मला आश्चर्य एका गोष्टीचे वाटते की जर एखाद्याला यायचे असेल तर तो अशी  ध्वनीचित्रफित टाकून येतो का? असा सवाल त्यांनी केला.

Sharad Pawar : “महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने…”; मराठा आरक्षणावर शरद पवारांचे पहिल्यांदाच भाष्य

दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ११० आमदार आहेत. त्यामुळे त्यांना नजर अंदाज करता येत नाही. मात्र माझ्याकडे ११० आमदार असते तर मी नवीन सरकार बनवले असते, असे विधान केले. या विधानाबद्दल विचारले असता हाच शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फरक आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नेतृत्वखाली महाराष्ट्राचा विकास पूर्ण ताकदीने करण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि राहणार आहोत, असेही फडणवीस म्हणाले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

धक्कादायक! एकाच कुटुंबातील ७ जणांची आत्महत्या

- Advertisment -

ताज्या बातम्या