मुंबई | Mumbai
नागपूरातील (Nagpur) महाल भागात सोमवारी (दि.१७) रोजी रात्री दोन गटांमध्ये तुफान दगडफेक आणि जाळपोळ होऊन मोठा हिंसाचार झाला. या हिंसाचारावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. त्यानंतर आज या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात निवदेन दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) हल्लाबोल करत विधानपरिषदेत मोठा गौप्यस्फोट केला.
यावेळी बोलतांना शिंदे म्हणाले की,”खुर्चीसाठी यांनी (उद्धव ठाकरे) बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. तुम्ही काँग्रेससोबत जाऊन खुर्ची मिळवली, विचारधारा सोडली. यांचे प्रमुख हे दिल्लीला गेले होते लोटांगण घालून आले. मला वाचवा मला वाचवा म्हणाले, तिथं जाऊन सांगून आले की आम्ही महायुती सरकारमध्ये (Mahayuti Government) सामील होऊ. मात्र, त्यांचा डाव मी पलटवून टाकला.नोटीस आल्यावर गेले होते लोटांगण घालायला”, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना जेलमध्ये टाकण्याचा त्यांचा डाव होता. औरंग्याचे विचार यांनी घेतले मात्र मी यांना सोडले. त्यामुळे माझ्या सोबत ६० लोक आले, हिंदुत्वाच सरकार मी आणले. तुम्हाला फक्त २० लोक निवडून आणता आले. एक अंदर की बात सांगतो यांचे प्रमुख (उद्धव ठाकरे) मोदींना भेटायला गेले आणि माफी मागू लागले मला वाचवा. अनिल परब तुम्ही देखील दिल्लीला (Delhi) गेला होतात आणि तिथ जाऊन माफी मागितली आणि राज्यात माघारी येऊन पलटी मारली”, असेही एकनाथ शिंदेंनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, “मै शेर का बच्चा हूँ, ८० जागा लढवल्या आणि ६० जागा जिंकल्या. अनिल परब तुमच्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. कोण नोटिसला घाबरून कुठे गेले हे मला माहिती आहे. मी कमरेखाली वार करत नाही. तुम्हाला नोटिस आल्यानंतर कुठे गेला मला माहिती आहे. मला जोपर्यंत कोणी डिवचत नाही तोपर्यंत मी कुणाची कळ काढत नाही. सचिन आहिर तुम्हाला बरंच काही माहिती आहे. मी खुर्चीसाठी काहीच केले नाही मी स्वतः अमित शाह (Amit Shah) आणि नरेंद्र मोदींना फोन (Phone) करून सांगितले तुम्ही सांगाल तो निर्णय मला मान्य असेल”, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.