Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशजम्मू-काश्मिरात भाजप सर्वात मोठा पक्ष, मात्र 'गुपकार'ची आघाडी

जम्मू-काश्मिरात भाजप सर्वात मोठा पक्ष, मात्र ‘गुपकार’ची आघाडी

जम्मू – काश्मीर :

जम्मू काश्मीर जिल्हा विकास परिषद निवडणुकीचा अंतिम निकाल हाती आला आहे. या निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. परंतु सात पक्षांच्या ‘गुपकार’ गटाने सर्वात मोठी आघाडी घेतली.

- Advertisement -

जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर ही केंद्रशासित प्रदेशातील पहिलीच निवडणूक होती. आठ टप्प्यांमध्ये पार पडलेल्या जिल्हा विकास परिषद निवडणुकीची सुरुवात २८ नोव्हेंबर रोजी झाली होती. या दरम्यान २८० जागांवर निवडणुका पार पडल्या. २८० पैंकी १४० जागा जम्मू विभागात तर १४० जागा काश्मीर विभागात येतात.जम्मू काश्मीरमध्ये भाजपने पहिल्यांदाच आपले खाते उघडले. भाजपला 74 ठिकाणी विजय मिळाला.

हे पक्ष आहेत गुपकारमध्ये

जिल्हा विकास परिषद निवडणुकीत भाजपविरुद्ध सात दलांनी एकत्र येत ‘गुपकार’ आघाडी स्थापन केली. यामध्ये नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, पीपल्स कॉन्फरन्स, आवामी नॅशनल कॉन्फरन्स, जम्मू काश्मीर पीपल्स मूव्हमेंट, सीपीआय, सीपीएम या पक्षांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या