Tuesday, April 29, 2025
Homeनाशिकनाशिकमध्ये आज डी-लिस्टिंग महामेळावा; देशभरातून घटनातज्ञ,साधू-महंत दाखल

नाशिकमध्ये आज डी-लिस्टिंग महामेळावा; देशभरातून घटनातज्ञ,साधू-महंत दाखल

नाशिक | Nashik

नाशिकमध्ये जनजाती सुरक्षा मंचाद्वारे ‘डी लिस्टिंग’ मागणीसाठी आज रविवार (दि. २९) रोजी भव्य डी-लिस्टिंग महामेळावा (De-listing Convention) आयोजित करण्यात आला आहे. यात नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर आदी जिल्ह्यातून पन्नास हजारांपेक्षा अधिक आदिवासी बांधव उपस्थित राहून डी-लिस्टिंगचा हुंकार करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने सोलापूर येथून फासेपारधी समाजाची उल्लेखनीय उपस्थिती असणार आहे…

- Advertisement -

प्रत्येक गाव व पाड्यांमधून २७०० पेक्षा अधिक वाहनांचे नियोजन पूर्ण झालेले असून आदिवासी बंधूंना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरिता जनजाती सुरक्षा मंच व समविचारी संघटनांनी संपूर्ण तयारी केलेली आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता भव्य मंडपाची निर्मिती करण्यात आली आहे. नाशिक शहरातील ३५ हजार घरांमधून या मेळाव्याकरिता आलेल्या आदिवासी बंधूंना फूड पॅकेट्स तसेच पाण्याची बाटली उपलब्ध करून दिली जाणार आहे.

तसेच सकाळी दहा वाजता गोल्फ क्लब मैदान येथून रॅलीला सुरुवात होणार आहे. तसेच जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन सर्व आदिवासी बांधव हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) येथे बांधलेल्या भव्य मंडपामध्ये येऊन डी-लिस्टिंगची मागणी करणार आहेत. संपूर्ण भारतातून विविध मान्यवर, आदिवासी नेते, साधू महंत या महासोहळ्यामध्ये सामील होणार आहेत.

दरम्यान, यावेळी मध्यप्रदेश येथील निवृत्त न्यायाधीश अॅड.प्रकाश उईके, कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामचंद्र खराडी, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत (तुंगार), रघुनाथ महाराज (देवबाप्पा) (फरशीवाले बाबा), रमणगिरी गुरु (मौनगिरी) महाराज आदींचे मार्गदर्शन होणार आहे. या महामेळाव्यास समस्त आदिवासी बंधू तसेच नाशिककर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन निवृत्त पोलीस अधीक्षक तथा जनजाती सुरक्षा मंच महाराष्ट्र राज्य संयोजक पांडुरंग भांगरे, सहसंयोजक अॅड. किरण गबाले, गोरक्षनाथ चौधरी यांनी केले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दाखल पात्र विद्यार्थ्यांसोबत निरक्षर व्यक्ती शोधा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar देशातील 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसित करून साक्षर केले जाणार आहे. यासाठी...