मुंबई । वृत्तसंस्था Mumbai
उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी म्हणजेच एचएसआरपी (HSRP )बसवण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत अतिशय थोड्याच वाहनांना एचएसआरपी प्लेट बसवून झाल्याने परिवहन आयुक्तांनी ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
- Advertisement -
ही नंबर प्लेट बसवण्याच्या निर्णयावरुन अनेक वाद उद्भवले होते. तसेच राज्य सरकार जास्तीचे पैसे आकारत असण्यावरुन सरकारवर टीका देखील झाली होती.
सध्या 30 मार्चनंतर 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, आता तिसरी 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत अंदाजे 18 लाख गाड्यांनी एचएसआरपी बसवल्याचा अंदाज आहे.
