Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमारहाणीत २८ वर्षीय युवकाचा मृत्यू

मारहाणीत २८ वर्षीय युवकाचा मृत्यू

सुरगाणा । प्रतिनिधी Surgana

- Advertisement -

सुरगाणा शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या बुबळी येथे दोन भावांकडून झालेल्या गंभीर मारहाणीत २८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत युवकाचे नाव हरिश्चंद्र मनोहर देशमुख (28) रा. बुबळी असे असून मयत हरिश्चंद्र याची पत्नी मनीषा देशमुख हिने याबाबत फिर्याद दाखल केली आहे. याच बुबळी गावातील नारायण प्रभाकर चौधरी आणि किरण प्रभाकर चौधरी या दोन्ही भावात आणि हरिश्चंद्र यांच्यात वाद होऊन झालेल्या मारहाणीत नारायण व किरण या दोघांनी हरिश्चंद्र यास लोखंडी पाईपाने डोक्यात आणि हातापायावर मारहाण केली. केलेल्या मारहाणीत डोक्यात गंभीर दुखापत झाली. गंभीर मारहाणीमुळे हरिश्चंद्र याचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर दोघे भाऊ फरार झाले होते. त्यानंतर पोलिसांनी तपास चक्रे फिरवून एक आरोपी नारायण चौधरी यास वणी येथून ताब्यात घेतले आहे. दुसर्‍या भावाचा शोध पोलीस घेत आहेत. ही घटना काल रात्री बारा वाजेच्या सुमारास घडली. मारहाणीचे निश्चित कारण तपासाअंती समोर येईल. हरिश्चंद्र याच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल मोरे हे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...