Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदुचाकी-कार अपघातात दाम्पत्याचा मृत्यू

दुचाकी-कार अपघातात दाम्पत्याचा मृत्यू

अपघातास कारणीभूत कार चालक मयतांचा भाचा

शिरवाडे वाकद | वार्ताहर

- Advertisement -

निफाड तालुयातील खेडलेझुंगे गावाजवळील नदीवरील पुलावर शविारी( दि. १ ) सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास दुचाकी आणि चारचाकी वाहनात झालेल्या अपघातात पती – पत्नीचा जागीच मृत्यू झाला. अपघातात कारणीभूत ठरलेल्या चारचाकी वाहनाचा चालक हा मयत दाम्पत्यांचा भाचा असल्याचे समोर आल्याने परिसरात संताप व्यक्त करण्यात येत होता.

YouTube video player

मिळालेल्या माहितीनुसार, किसन एकनाथ दराडे (वय ३८) आणि त्यांची पत्नी बेबी दराडे, दोघेही खंबाळे (ता. सिन्नर) येथील रहिवासी होते. हे दोघे आपल्या दुचाकीने (एम.एच.१५ बी. वाय ५७२५) खंबाळ्याकडे जात होते. दरम्यान, खेडलेझुंगे नदीवरील पुलावर मागून आलेल्या इको (एम.एच.१५ जे.एस.१९५४ या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, किसन दराडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी बेबी दराडे यांना गंभीर जखमी अवस्थेत स्थानिक समाजसेवकांनी तत्काळ मदत करून निफाड येथे उपचारासाठी घेऊन जात असतांना उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

अपघातात सहभागी इको वाहन भाऊसाहेब साखहरी साबळे (वय ३३) चालवत होते. विशेष म्हणजे दराडे व साबळे हे मामा-भाचे असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी के. के. पाटील, सायखेडा पोलीस ठाण्याचे स.पो.नि विकास ढोकरे तसेच लासलगाव पोलीस ठाण्याचे स.पो.नि.भास्करराव शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास उपविभागीय अधिकारी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि ढोकरे करत आहेत.

दरम्यान, अपघातातील चारचाकी चालक भाऊसाहेब साबळे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी दराडे दाम्पत्याच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

अत्याचार

त्या नराधमाला पाहताच चिमुकली घाबरुन पालकांच्या मागे लपली; बदलापूरात पुन्हा चिमुकलीवर...

0
बदलापूर | Badlapurबदलापूरमध्ये पुन्हा एकदा शाळेतील लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका चार वर्षांच्या मुलीसोबत शाळेच्या बसमध्ये हे कृत्य...