नाशिक। प्रतिनिधी Nashik
बादलीतील पाणी खेळतांना त्यात पडून बुडल्याने चार वर्षीय बालिकेचा अंत झाला. रागनी मनाेजकुमार वनवासी(रा. सुपरनेल इंडस्ट्रिअल, ग्लॅस्काे बसस्टॅन्डसमाेर, एमआयडीसी अंबड, नाशिक) असे मृत बालिकेचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि. २२) दुपारी एक वाजता सुपरनेल कंपनीच्या आवारात घडली.
रागनीचे आई वडील हे कुटुंबासह कंपनीत वास्तव्यास असून शनिवारी तिचे आई वडील नियमित कामकाज करत हाेते. त्याचवेळी आंघाेळीसाठी असलेल्या जागेवरील एका माेठ्या बादलीत रागनी पाणी खेळत हाेती. त्याचवेळी तिचा ताेल गेल्याने ती बादलीत पडली. ती ओरडू लागली असताना तिचे नाक व ताेंड बादलीत अडरकल्याने तिचा श्वास गुदमरला व बादलीतील पाणी तिच्या नाकाताेंडात गेले. त्यामुळे ती बेशुद्ध झाली.
कालांतराने तिच्या कुटुंबाने तिची शाेधाशाेध केली असता, रागनी पाण्याच्या बादलीत पडल्याचे दिसून आले. तत्काळ तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डाॅ. घुटे यांनी तपासून मृत घाेषित केले. या घटनेने अंबड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.