Monday, July 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजब्रह्मगिरी पर्वतावर अनाेळखी तरुणाचा मृत्यू

ब्रह्मगिरी पर्वतावर अनाेळखी तरुणाचा मृत्यू

नाशिक। प्रतिनिधी Nashik

त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी डोंगरावरील जटा मंदिराजवळील उंचावरून काेसळल्याने एका अनाेळखी तरुणाचा मृत्यू झाल्याचे गुरुवारी(दि. ३) समाेर आले. ताे पाय घसरुन काेसळला की त्याने आत्महत्या केली हे त्याची ओळख पटल्यावरच समाेर येणार आहे. यासह हा घात की अपघात या दृष्टीने तपास सुरु झाल्याचे कळते.

- Advertisement -

वीस ते बत्तीस वयाेगटातील तरुणाचा मृतदेह जटा मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या ठिकाणावरुन २० फूट खाेल दरीत पडल्याचे काही पर्यंटकांना गुरुवारी(दि. ३) सायंकाळी पाच वाजता नजरेस पडले. त्यांनी तत्काळ त्र्यंबकेश्वर पाेलीसांना माहिती कळविली. यानंतर पाेलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, वनविभागाचे अधिकारी व रेस्क्सू टीम दाखल झाली.

शोध व बचाव कार्यासाठी एनसीआरए, आपदा मित्र व दुर्गराज अ‍ॅडव्हेंचरचे ओम उगले आणि टीमने मृतदेह रॅपलिंग करुन बाहेर काढला. तीन तास चाललेल्या या रेस्क्यूमध्ये मृताची ओळख पटविण्याचे काम सुरु हाेते. दरम्यान, अंधार, पाऊस आणि धुके असल्याने मदतकार्यात अडथळा आला. मृताची ओळख पटविली जात असून आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर आता ‘E20 इंधन’ लक्ष्य; आम आदमी पार्टी आक्रमक,...

0
दिल्ली । Delhi केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता आम आदमी पार्टीने (AAP) केंद्र सरकारच्या २० टक्के एथेनॉल...