Friday, March 28, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNashik : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Nashik : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad

नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या गांधीनगर जवळील विजय ममता चित्रपटगृहाजवळ ट्रॅक्टरची वाहतूक करणाऱ्या ट्रकची एका तरुणाला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक युवक जागीच ठार झाल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव सागर यशवंत हिरे, वय 31, राहणार पंचक, जेलरोड, नाशिक रोड असे असून तो गांधीनगर परिसरातून आपली दुचाकी गाडी क्रमांक एम एच 15 के बी 77 38 या गाडीवरून जात असताना ट्रॅक्टर वाहून नेणाऱ्या ट्रकची हिरे यास जोरदार धडक बसली असता तो गंभीर जखमी झाला व मागील चाकाखाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

सदरची घटना समजताच परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली त्यानंतर ही माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून सदरचा ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे त्याचप्रमाणे ट्रक चालकाविरुद्ध अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दै. ‘देशदूत’ आयोजित ‘पंचवटी अनेक्स प्रॉपर्टी एक्स्पोला’ शानदार सुरुवात

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik उत्तम दर्जा, सुयोग्य स्थान, भरपूर सुविधा आणि वाजवी मूल्य या चतु:सूत्रीचा संगम साधलेल्या गृहप्रकल्पांचा अंतर्भाव असलेल्या 'देशदूत' आयोजित 'पंचवटी अनेक्स (जत्रा...